भारतात बेरोजगारी दर हा कमालीचा वाढताना दिसतोय. अनेक सुशिक्षित तरुण नोकरी मिळत नसल्याने, चिंतेत सापडलेली दिसत आहेत. तसेच अनेक सुशिक्षित तरुणांना त्यांच्या कॉलिफिकेशन नुसार नोकरी मिळत नाही, तर काही व्यक्ती त्यांना मिळत असलेल्या मानधनात आपला संसार चालवू शकत नाही, आणि त्यासाठी त्यांना एक्स्ट्रा इन्कम ची आवश्यकता असते. म्हणून असे अनेक युवक व्यवसाय करण्याच्या विचारात असतात. पण व्यवसायाची योग्य ती समज नसल्याने तसेच बिजनेसची कुठलीच कल्पना सुचत नसल्याने अशा लोकांना व्यवसाय सुरू करण्यात अडचणी निर्माण होतात.
म्हणून आज आम्ही खास अशा व्यक्तींसाठी काही बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत. हे बिझनेस आपण आपल्या राहत्या घरातून देखील सुरू करू शकता आणि चांगली मोठी कमाई करू शकता चला तर मग मित्रानो वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेस विषयी सविस्तर.
इन्शुरन्स एजंट
जर आपणास अनेक प्रयत्नानंतर देखील नोकरी मिळत नसेल, आणि आपण हल्ली पण तेच काम करत नसाल तर आपण विमा एजंट चे काम करून सांगली मोठी कमाई करू शकता. जर तुमच्याकडे चांगले संवाद कौशल्य असेल तसेच रिलेशन बिल्डींगची आपल्याकडे कला असेल तर मग आपण एक चांगले इन्शुरन्स एजंट म्हणून काम करू शकता. हा व्यवसाय आपण अगदी कमी इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता. विमा पॉलिसी लोकांना विकून आपण चांगले कमिशन प्राप्त करू शकता.
नेटवर्क मार्केटिंग
जर आपणासही कमी भांडवलात आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर नेटवर्क मार्केटिंग आपल्यासाठी एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. आपण नेटवर्क मार्केटिंग चे काम आपण रहात असलेल्या घरातून देखील सुरू करू शकता आणि यातून चांगली मोठी कमाई सुद्धा करू शकता. नेटवर्क मार्केटिंग या कामात आपणास एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा सेवा विक्री करायच्या असतात, यावर आपणास कमिशन मिळत असते. एकंदरीत हा एक रेफरल बिजनेस आहे आणि आपण हा आपल्या घरातून देखील ऑपरेट करू शकता.
मॅरेज ब्युरो
अलीकडे विशेषता कोरूना नंतर अनेक जण ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लग्नाची स्थळ शोधताहेत, अनेक जणांची लग्न देखील या प्लॅटफॉर्मवर जुळून येत आहेत. म्हणून आपण देखील आपल्या घरातच मॅरेज ब्युरो उघडून लग्न जमविण्याचे पुण्याचे काम सुरु करू शकता. शिवाय यातून आपण चांगली कमाई देखील करू शकता.
Share your comments