1. इतर बातम्या

Small Business Idea 2022 : 50 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय ; होणार अल्प कालावधीत श्रीमंत

Small Business Idea In India : देशात असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात खूप कमी पैसे गुंतवून चांगले उत्पन्न मिळवता येते. केंद्रातील मोदी सरकारही व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. यासोबतच सरकारने स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा फायदा आता भारतातील नागरिकांना घेता येणार आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
low investment business idea should be very helpful for villagers

low investment business idea should be very helpful for villagers

Small Business Idea In India : देशात असे अनेक व्यवसाय आहेत ज्यात खूप कमी पैसे गुंतवून चांगले उत्पन्न मिळवता येते. केंद्रातील मोदी सरकारही (Modi Government) व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवित आहे. यासोबतच सरकारने स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा फायदा आता भारतातील नागरिकांना घेता येणार आहे.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची मागणी आणि बाजारपेठ पाहणे अत्यंत आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाची माहिती सांगणार आहोत ज्याची मागणी खेड्यापासून ते मोठमोठ्या मेट्रो शहरांपर्यंत आहे. मित्रांनो आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे एलईडी बल्ब (LED Bulb Making Business) बनवण्याचा.

हेही वाचा : Electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरची ग्राहकाने काढली गाढवाला बांधून गावभर धिंड, कारणही आले समोर..

एलईडी बल्बची मागणी बाजारात खूप वाढली आहे. हे बल्ब आल्यानंतर गावागावात रोषणाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय या बल्बची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याला वापरण्यासाठी खूपच कमी वीज खर्च करावी लागते यामुळे विजेचे बिलही कमी झाले आहे.

हा बल्ब टिकाऊ असतो आणि बराच काळ टिकतो. प्लास्टिकचा असल्याने तूट-फूट होण्याची भीती देखील नसते. LED ला लाइट एमिटिंग डायोड म्हणतात. जेव्हा इलेक्ट्रॉन अर्धसंवाहक सामग्रीमधून जातात तेव्हा ते LEDs नावाच्या लहान कणांना प्रकाश देतात. हा बल्ब सर्वात जास्त प्रकाश देतो.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की LED बल्बचे आयुष्य साधारणपणे 50000 तास किंवा त्याहून अधिक असते, तर CFL बल्बचे आयुष्य फक्त 8000 तासांपर्यंत असते. विशेष बाब म्हणजे एलईडी बल्ब रिसायकल करता येतात. LEDs मध्ये CFL बल्ब सारखा पारा नसतो, परंतु शिसे आणि निकेल सारखे घटक असतात.

हेही वाचा : ग्रामीण भागात करा हे व्यवसाय आणि कमवा बक्कळ पैसा

कमी भांडवल मध्ये सुरू केला जाणारा व्यवसाय (A business started with low capital)

मित्रांनो जर आपणास व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत सुरु केल्या जाणाऱ्या बाकी सर्व व्यवसायात हा सर्वोत्तम व्यवसाय मानला जातो. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक संस्था एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण देतात. आता सर्वत्र स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यासोबत एलईडी बल्ब बनवणाऱ्या कंपन्या देखील आता प्रशिक्षण देतात. त्यांच्याशीही संपर्क साधता येऊ शकतो.

हेही वाचा : Royal Enfield : 33 हजारात घरी न्या रॉयल इनफिल्डची 'ही' बाईक

कुठून घेणार प्रशिक्षण? (Where to get training?)

एलईडी बल्ब बनवण्याच्या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला एलईडीचे बेसिक, पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्रायव्हर, फिटिंग-टेस्टिंग, साहित्य खरेदी, मार्केटिंग, सरकारी अनुदान योजना आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सविस्तर अवगत केले जाईल. जर तुम्हाला हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय फक्त 50,000 रुपयांत सुरू करता येऊ शकतो. या व्यवसायासाठी तुम्हाला कुठलेच दुकान उघडण्याची गरज नाही, तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या आरामात सुरू करू शकता.

हेही वाचा : शॉपिंग करायची आहे का? तर YONO ॲपवरून द्या ऑर्डर आणि मिळवा 70 टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट

एलईडी बल्ब व्यवसायातून किती होणार कमाई (How Much Money Does an LED Bulb Business Make?)

एक बल्ब बनवण्यासाठी सुमारे 50 रुपये खर्च येतो आणि तो बाजारात 100 रुपयांना सहज विकला जातो. म्हणजेच एका बल्बवर दुप्पट नफा मिळतो. तुम्ही एका दिवसात 100 बल्ब बनवले तरी थेट 5000 रुपये तुमच्या खिशात येतील. म्हणजे दरमहा 1.50 लाख रुपयांपर्यंत आपण सहज कमाई करू शकता.

हेही वाचा : गावात कमी खर्चात सुरू होणारे तीन प्रकारचे उद्योग धंदे; महिन्याला मिळेल हजारो रुपयाचा नफा

English Summary: Small Business Idea 2022: Start 'This' Business For 50 Thousand; Will be rich in a short time Published on: 25 April 2022, 03:07 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters