भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतातील एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे. 2000 पेक्षा जास्त शाखा आणि 14 लाखांहून अधिक एजंट असलेली ही भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे.
विशेष म्हणजे सुरक्षित गुंतवणूक आणि त्यावर चांगला परतावा या कारणामुळे कंपनी देशात खूप लोकप्रिय झाली आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन योजना चालवते.
आपण पाहणार आहोत ती एलआयसीची सरल पेन्शन योजना (Saral Pension Scheme of LIC) आहे. तुम्ही एलआयसी सरल पेन्शन योजनेत वयाच्या ४० व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. 1 जुलै 2021 रोजी सरल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.
दिलासादायक! पालेभाज्यांच्या दरात घट; जाणून घ्या आजचे बाजारभाव
एकरकमी गुंतवणूक
एलआयसीची ही पॉलिसी घेण्यासाठी तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, गुंतवणुकीची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत केली जाते. जेवढी पेन्शन सुरु होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर चालू राहते.
या योजनेसाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. तुम्ही या योजनेचा लाभ एकट्याने किंवा पती-पत्नीसोबत घेऊ शकता. पॉलिसीधारक ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर करू शकतो.
योजनेची वैशिष्ट्ये
जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ (Monthly pension benefit) घ्यायचा असेल तर तुम्हाला दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे तिमाही पेन्शनसाठी किमान एका महिन्यात 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.
शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
पेन्शन मिळवण्यासाठी हे चार पर्याय
ग्राहक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन (Annual Pension) घेऊ शकतात. मासिक पेन्शन किमान 1000 रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6,000 रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 रुपये असते.
पेन्शनच्या कमाल रकमेवर मर्यादा नाही. उदाहरणार्थ, तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि तुम्ही 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी करत असाल तर तुम्हाला मासिक पेन्शन म्हणून 12,388 रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या
लष्करी अळीपासून बचाव करण्यासाठी वापरा 'हे' तंत्र
Business Tips: 15 हजार रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत होणार कमाई
दूध उत्पादकांना मोठा दिलासा; १ सप्टेंबर पासून दुधाच्या दरात ७ रुपयांनी होणार वाढ
Share your comments