सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला पोहोचले आहेत.त्यामुळे सर्वसामान्यांनापेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वापरणेफार कठीण होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल हा एलेक्ट्रिक स्कूटर मध्येपाहायला मिळत आहे.
जर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा असेल तर तुम्ही या टॉप टेन स्कूल इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल विचार करू शकता. या स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 100 किलो मीटर पेक्षा जास्त मायलेज देतील.या लेखात आपण या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती घेऊ.
या आहेत चांगल्या मायलेज देणार्या इलेक्ट्रिक स्कूटर
ओला एस-1 आणि एस-1 प्रो- ओला कंपनी ची एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर सध्या खूप चर्चेत आहे. हे स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 121 की मी रेंज देते. इ स्कूटर 90 केएमपीएचच्या टॉपस्पीड वर चालवूशकता. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच तास लागतात. या स्कूटर ची किंमत 99999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
- तसेच ओढला स्कूटरचे एस1 प्रो मॉडेल देखिल आहे.ज्याची किंमत एक लाख तीस हजार रुपये आहे.हीस्कूटर तीन सेकंदात 0 ते 40 किमी प्रति तास वेग पकडू शकते. हे स्कूटर दहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
- TVS iQube-ही स्कूटर 2020 च्या सुरुवातीलासादर करण्यात आली. या स्कूटर मध्ये 4.4 KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर मिळते. हे स्कूटर एका वेळच्या चार्जिंग मध्ये सुमारे 75 किमी चालते. तसेच या स्कूटरला 78 KMPH चा स्पीड देण्यात आला आहे. या स्कूटरची भारतीय बाजारात किंमत सुमारे 1.15 लाख रुपये आहे. मी ताशी 40 किमी चा वेग 4.2 सेकंदात पकडते.
- सिम्पल वन- इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच लॉन्च करण्यात आलीआहे. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4.8KWhलिथियम आयन बॅटरी मिळेल. ही बॅटरी 6 bhp पावर च्या इलेक्ट्रिक मोटर्स सह येते. कंपनीच्या मते हि इलेक्ट्रिक स्कूटर 236 किमी पर्यंतचा रेंज सह येते.तसेच जास्तीत जास्त 105Kmph ज्या वेगाने चालवता येते. इलेक्ट्रिक स्कूटर चार रंगात खरेदी करता येते. या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरूम किंमत 1.1लाख रुपये आहे.
Share your comments