इलेक्ट्रिकल स्टार्टअप सिम्पल एनर्जी या कंपनीने देशातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केलीआहे. या इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत( एक्स शोरूम) 1.10 लाख रुपये आहे. या स्कूटर साठी कंपनीने त्यांच्या असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग घेणे सुरू केले आहे.
ही स्कूटर ग्राहक 1947 रुपये या परत करणे योग्य टोकन रकमेसह बुक करू शकता. या स्कूटरची लॉन्चिंग 15 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. या स्कूटर ची निर्मिती पहिल्या टप्प्यात 10 लाख वाहनांची वार्षिक उत्पादन क्षमता असलेल्या तामिळनाडू राज्यातील होसूर येथील EV निर्मात्या कंपनीच्या प्लांटमध्ये करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ही ईस्कूटर तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गोवा तसेच देशातील एकूण 13 राज्यांमध्ये उपलब्ध के करण्यात येणार आहे.
या सिम्पल एनर्जी इलेक्ट्रिक स्कूटर च्या बॅटरी ची वैशिष्ट्ये
- ही स्कूट र4.8 kWh पोर्टेबल लिथियम आयन बॅटरी सह सुसज्ज आहे.
- या बॅटरीचे वजन हे सहा किलोपेक्षा जास्त आहे.
- या इलेक्ट्रिक स्कूटर चे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एक स्कूटरच्या डीटेचबल कानी पोर्टेबल नेचर मुळे ईस्कूटर ची बॅटरी घरीचार्ज करणे सोपे होते.
- साध्या लूप चार्जर ने जरी ही बॅटरी चार्ज केली तरी ती 60 सेकंदाच्या चार्जिंग वर अडीच किमी पर्यंत धावेल.
या सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटर ची वैशिष्ट्ये
- इलेक्ट्रिक स्कूटर फ्युचरस्टिक डिझाईन ला सपोर्ट करेल आणि मीड ड्राईव्ह मोटर वर आधारित असेल.
- यामध्ये 30 लिटर बुट स्पेस देण्यात आली आहे. तसेच चाके 12 इंचाचे असून सात इंचाचा डिजिटल डॅशबोर्ड, ऑन बोर्ड नेवीगेशन,जिओ फेन्सिंग, एसओएस मेसेज, डॉक्युमेंट स्टोरेज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल.
- सिम्पल वन ई स्कूटर रेड,व्हाईट,ब्लॅक आणि ब्लू अशा चार कलर ऑप्शन मध्ये येते.
- ही सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटर हीरो इलेक्ट्रिक, ओकिनावा आणि ओला इलेक्ट्रिक स्कूटर शी स्पर्धा करेल.
- ही स्कूटर सिंगल चार्ज मध्ये इको मोड मध्ये 203 किलोमीटर आणि आयडीसी स्थितीत 236 किलोमीटरची रेल प्रदान करेल.
- या स्कूटरचा टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतका आहे.
Share your comments