Cyrus Mistry Death Updates: टाटा सन्सचे (Tata Son’s) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं (Cyrus Mistry Death) रविवारी कार अपघातात निधन झालं. या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.
2 चुकांमुळे सायरस मिस्त्री यांनी गमावला प्राण
१. सायरस मिस्त्री आणि त्याच्यासोबत असलेल्या सहप्रवाशीनी सीट बेल्ट लावलेला (Cyrus Mistry’s Accident) नव्हता.
२. तसेच त्यांची कार प्रचंड वेगात होती. लक्झरी कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किलोमीटर अंतर कापले होते, अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात जागीच मृत्यू
मुंबईपासून 120 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर सायरस मिस्त्री यांच्या लक्झरी कारचा 20 किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरला कार धडकून मिस्त्री आणि जहांगीर पंडोळे हे दोघे जागेवरच ठार झाले.
मुंबईतील स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पंडोळे (वय-55) या कार चालवत होत्या अशी माहिती समोर आली आहे. या अपघातात अनाहिता आणि त्यांचे पती गंभीर जखमी झाले आहेत.
Share your comments