दिवसेंदिवस सायबर क्राईम मध्ये वाढ होत आहे. ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार फारच प्रमाणात वाढल्याचे काही दिवसांपासून निदर्शनास येत आहे.
या पार्श्वभूमीवर देशातील अग्रगण्य बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना काही ॲप्स पासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. या बाबतीत बँकेने म्हटले आहे की या चार ॲप्स पासून दूर राहा अन्यथा तुमचे खाते रिकामे होऊ शकते.
बऱ्याच दिवसांपासून अशा माध्यमातून लोकांची फसवणूक होत आहे.
.याबाबत स्टेट बँकेने ग्राहकांना सांगितले की, त्यांनी AnyDesk, Quick Support, TeamViewer आणि Mingleview यासारखे ॲप्स फोन मध्ये इन्स्टॉल करू नयेत. बँकेने आपल्या सगळ्या ग्राहकांना युनिफाईड पेमेंट सिस्टम बद्दल सावध केले आहे आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तींकडून किंवा एखादा स्त्रोत त्यांच्याकडून यूपीआयपीन आणि क्यू आर कोड स्वीकारू नये असे सांगितले आहे.तसेच कुठल्याही अज्ञात वेबसाइटवरून हेल्पलाईन क्रमांक घेऊन त्यावर फोन लावू नका.
एसबीआयच्या नावाने अर्धा डझनहून अधिक बनावट वेबसाइट सध्या हाकर्स वापरत असल्याचे बँकेनेसांगितले आहे. बँकेने ग्राहकांना सल्ला दिला आहे की बँक प्रत्येक डिजिटल व्यवहारानंतर एसेमेस पाठवते जर तुम्ही व्यवहार केला नसेल तर तो संदेश लगेच खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवा.
ग्राहक सेवा क्रमांक-18000111109,9449112211,080 26599990
155260( नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल)
Share your comments