सॅमसंग कंपनी सगळ्यांनाच माहिती आहे. वेगवेगळी उपकरणे निर्मिती क्षेत्रामध्ये या कंपनीचा नावलौकिक आहे. एवढेच नाही तर मोबाईल निर्मिती क्षेत्रामध्ये देखील सॅमसंगने बऱ्याच वर्षापासून एक वर्चस्व स्थापन केले आहे. जर आपण स्मार्टफोनचा विचार केला तर वेगवेगळे प्रकारचे स्मार्टफोन मार्केटमध्ये आणले आहेत.
यातच कंपनीने आत्ताच नुकताच जागतिक स्तरावर सॅमसंग गॅलक्सी-A04 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा सर्वसामान्य व्यक्तींच्या खिशाला परवडेल या किमतीमध्ये आणि भरपूर अशी वैशिष्ट्ये असलेला स्मार्टफोन आहे.
सॅमसंग गॅलेक्सी-04 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मोबाईलचा डिस्प्ले हा साडे सहा इंचाचा HD+Infinity-v आहे. तसेच ऑक्टा कोर SoC प्रोसेसरद्वारे समर्पित आहे. तसेच या फोन मध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सरसह डुएल रियर कॅमेरा सेट अप मिळतो.
जर आपण या स्मार्टफोनचे बॅटरीचा विचार केला तर 5000mAh बॅटरी पॅक असणार आहे. हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन गॅलक्सी A03 अपग्रेड केलेली एडिशन आहे. या दोनही फोनमध्ये बऱ्याच प्रकारचे साम्य आहे परंतु याच्या मागील पॅनलवर बदल करण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 128 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असून जय मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी साठी वाय फाय, ब्लूटूथ v5.0 आणि जीपीएस/A-GPS यांचा समावेश आहे.
जर या स्मार्ट फोनचा रॅमचा विचार केला तर यामध्ये आठ जीबी पर्यंत रॅम असून याबाबत सॅमसंगचे म्हणणे आहे की बाजारानुसार रॅमचे प्रकार बदलू शकतात.
नक्की वाचा:भारीच की! iPhone 12 वर मिळत आहे 25 हजार रुपयांहून बंपर सूट; पहा ऑफर...
या फोनची किंमत
तसे पाहायला गेले तर या फोनची किंमत अद्याप पर्यंत उघड करण्यात आलेली नसून हा स्मार्टफोन तीन रंगात मिळणार आहे ज्यामध्ये ब्लॅक,ग्रीन,कॉपर आणि व्हाईट कलर असे पर्याय मिळतील. पण आपण यामध्ये अगोदरच्या सॅमसंग गॅलक्सी A03 च्या किमतीचा विचार केला तर त्या फोनचे प्रारंभी किंमत दहा हजार 499 रुपये होती. याच अंदाजावर हा फोन देखील त्या श्रेणीत लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.
नक्की वाचा:SBI KCC: स्टेट बँकेचे किसान क्रेडिट कार्ड घरबसल्या मिळवा'या'पद्धतीने,वाचा माहिती
Share your comments