रॉयल एनफिल्ड म्हटले म्हणजे तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बुलेटची क्रेझ आहे. रॉयल एनफिल्ड चे सगळेच मॉडेल एकदम दमदार आहेत.
परंतु कंपनीच्या या सगळ्या बाईक मध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ही बाईक भारती कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. या लेखात आपण या बाईक विषयी माहिती घेऊ.
रॉयल एनफील्ड क्लासिक 350 बाईकचे वैशिष्ट्ये
1 सप्टेंबर रोजी कंपनीने या बाईकचे अधिकृत लॉन्चिंग केले आहे रॉयल एनफिल्ड 350 हे पूर्णपणे आधुनिक व नव्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. हे बाइक रॉयल एनफिल्ड कंपनीने नव्या J प्लॅटफॉर्मवर डेव्हलप केली आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर कंपनीने Royal Enfield Meteor 350 मध्ये केला आहे.या कंपनीची ही नवी बाईक G2 मॉडेल पासून इन्स्पायर्ड आहे.
तसेच या बाइकच्या हँडलँडडिझाईन पासून पेट्रोल टॅंक,मडगार्ड, कलर कॉम्बिनेशन आणि डिस्क ब्रेक पर्यंत क्लासिक लूक रिफ्रेश केला गेला आहे. या वैशिष्ट्यांमुळे ही बाईक पूर्णपणे नवीन ठरते. शहरातील रस्ते ते एडवेंचर टुरिझम या गोष्टी लक्षात घेऊन ही बुलेट बनविण्यात आली आहे.
क्लासिक 350 मध्ये Meteor 350 cruiser प्रमाणे 349 सीसी फ्युएलइंजेक्टेड इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन 20.2bhp पर्यंत पावर आणि 27 Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड गिअर बॉक्ससह कंपनीच्या नव्या J आर्किटेक्चरवरबुलेट डेव्हलप करण्यात आले आहे.
Share your comments