कोरडा मुळे लावण्यात आलेला लॉक डाऊन शितील करून आता अनलॉक झाल्यामुळे औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक उमेदवारांना कामाची नितांत गरज असल्यामुळे मी एक ते आणि रोजगार इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक यांच्यातर्फे 21 ते 25 जून दरम्यान ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या नियुक्तीच्या संदर्भातील सगळी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स, ऑनलाईन तसेच मोबाईल व दूरध्वनी द्वारे घेण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावी पास झाल्यानंतर पुढे काय? हा विद्यार्थ्यांमधील सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी या विषयावर 17 जून रोजी दुपारी तीन वाजता मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमाचे प्रक्षेपण कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेज NashikSkill यावर करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, ग्रॅज्युएट इत्यादी पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या भरभरून संधी उपलब्ध होणार आहेत..
ज्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास अशा उमेदवारांन www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. तसेच या संबंधित वेबपोर्टलवर लॉगिन करून जॉब फेअर टॅब वर क्लिक करून नाशिक ऑनलाईन जॉब फेअर -3(2021-22) जाऊन स्वतःच्या पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 0253-2972121 वर संपर्क साधावा.
Share your comments