पुणे: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वंशज शिवाजीराजे भोसले यांचं वृद्धपकालाने निधन झालं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे ते काका आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. 1985 ते1991 दरम्यान ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनाचे शिल्पकार ते आहेत.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म 23 एप्रिल 1947 रोजी साली झाला.साहित्य,कला,क्रीडा,सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली. 15 मे 1985 ते 16 डिसेंबर 1991 पर्यंत ते सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.
शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणलं जाणार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवाजीराजे यांची शांत आणि संयमी व्यक्तिमत्व अशी ओळख होती.
Share your comments