कोरोनाच्या काळात अनेक प्रकारची संकटे येऊन थडकली होती जे की भारतामध्ये तांदूळ आयातील मोठ्या प्रमाणात झळ लागली होती मात्र आता कुठे सर्व व्यवस्थितरित्या चालले होते तो पर्यंत आता रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात युद्ध सुरू असल्यामुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठवणे बंद केले केले त्यामुळे आता विदर्भातील गैरबासमती जसे की चिनार, श्रीराम कोलम या तांदूळ निर्यातीला फटका बसलेला आहे. कोरोना येण्याआधी गैरबासमती तांदळाची निर्यात जवळपास १३.०८ दशलक्ष टन झाली होती. जगात सर्वात जास्त भारत देश तांदळाची निर्यात करतो. जे की भारताने विदेशात ६.६ दशलक्ष टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे. यंदा भारताची तांदूळ निर्यात जवळपास ६५,२९७ कोटी रुपयांवर पोहचलेली आहे तर २०१९-२०२० मध्ये तांदळाची निर्यात ४५,४२६ कोटी रुपये होती. तांदळाच्या निर्यातीमधे महाराष्ट्र राज्यातील विदर्भाचा मोठा वाटा आहे. मात्र आता युद्धामुळे गैरबासमती तांदूळ निर्यातीला चांगलाच फटका बसलेला आहे. विदर्भातून जवळपास १० ते १२ हजार टन तांदूळ बाहेर पडतो.
कोरोनापूर्वी तांदूळ बाजारात दबदबा :-
कोरोना येण्याआधी तांदूळ निर्यात बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणात केली जात होती जे की जगात सर्वात जास्त तांदूळ उत्पादक भारत देश आहे. तांदळाच्या बाबतीत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. २०१९-२०२० साली भारताने जवळपास ४५,४२६ कोटी रुपयांची तांदूळ निर्यात केली होती. यंदाच्या वर्षी भारत देश जवळपास १४ ते १५ दशलक्ष तांदूळ निर्यात करेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठवणे बंद केले त्यामुळे तांदूळ निर्यातीला अडचणी निर्मान झाल्या आहेत. आधी कोरोनामुळे तांदूळ निर्यातीला अनेक अडचणी निर्माण झाल्या तर आता युद्धामुळे निर्यात बंद केली.
पारंपरिक तांदळाच्या मागणीलाही ब्रेक:-
कृषी संशोधन सुरू असल्याने बाजारपेठेत नेहमी कोणते ना कोणते तांदळाचे नवीन वाण येत असतात. भारत देशातील जे पारंपरिक वाण आहेत त्या वानांना जगभरात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे तांदळाच्या ११२१ या जातीच्या तांदळाला आखाती देशातून सर्वात जास्त मागणी आहे. मात्र आता रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात युद्ध सुरू असल्यामुळे भारताच्या पारंपरिक तांदळाच्या निर्यातीला ब्रेक लागलेला आहे. बाजारपेठेत जरी नवीन वाण येत असले तरी भारताच्या पारंपरिक तांदळाच्या वाणाला मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली आहे आणि इथून पुढे ही राहणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात निर्यात सुविधाचा अभाव :-
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गैरबासमती तांदळाची निर्यात खूप मोठ्या प्रमाणात होते मात्र त्या ठिकाणी पायाभूत सुविधा नसल्यामुळे चंद्रपूर चे तांदूळ उत्पादक नागपूरच्या व्यापाऱ्यांना तांदूळ विकतात. तर नागपूर मधील व्यापारी तो घेतलेला तांदूळ मुंबईमध्ये विकतात. मुंबई मध्ये आलेला तांदूळ जहाजद्वारे दुसऱ्या देताहेत जातो. जर राईस टेस्टिंग फेल झाले तर आर्थिक बुर्दंड बसतो. भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये तांदळाची योग्य त्या निर्यात सुविधा आहेत मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्यात सुविधांचा अभाव आहे.
Share your comments