कोरोना परिस्थिती आता बऱ्यापैकी निवडू लागल्याने सर्व काही आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विविध विभागांतर्गत भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशीच एक तरुणांसाठी चालून आली आहे.
नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन अर्थात एनटीपीसी मध्ये एक्झिक्युट ट्रेनीरिक्रुटमेंट या पदांसाठी भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.वित्त आणि मानव संसाधन क्षेत्रासाठी विविध ट्रेनी पदासाठी एकूण 60 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी NTPC careers.ntpc.co.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.ज्या उमेदवारांची या मध्ये निवड होईल त्यांना चांगला स्वरूपाचा पगार देखील दिला जाईल. एनटीपीसी च्या अधिसूचनेनुसार यासाठी ची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सात मार्चपासून सुरू होईल व यासाठीची अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 मार्च पर्यंत असेल.
रिक्त जागांचा तपशील
एनटीपीसीच्या अधिसूचनेनुसार विविध विभागांमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांवर 59 रिक्त जागा भरण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी वित्त चे20 पदे , एक्झिक्युट रेनी फायनान्स ( एम बी ए ) चे दहा पदे आणि कार्यकारी प्रशिक्षणार्थी ( एच आर)च्या 30 पदांचा समावेश आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता
चार्टर्ड अकाउंटंट ची किंवा प्रमाणित व्यवस्थापन लेखापाल आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय 29 वर्षापेक्षा जास्त नसावे.तसेच पात्रता आणि आरक्षणाची संबंधित माहिती तपशीलवार आधी सूचना दिली जाईल जी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
इतका मिळेल पगार
ज्या उमेदवारांना कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदावर नोकरी मिळेल त्यांना दर महिना 40 हजार ते एक लाख 40 हजार रुपये (E1 ग्रेड ) पगार दिला जाईल याशिवाय लागू भत्यांचा देखील समावेश असणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत
एनटीपीसी चे अधिकृत संकेतस्थळ ntpc.co.in वर भेट द्यावी.त्यानंतर पेज वर करिअर वर क्लिक करावे. विचारण्यात आलेल्या आवश्यक माहितीसह तुमचा अर्ज भरावा तसेच संबंधित कागदपत्रे अपलोड करावी आणि सब्मिट वर क्लिक करावे. अर्जाचे पुष्टीकरण पेज डाऊनलोड करा व प्रिंट आउट घ्या आणि पुढे संदर्भासाठी ते तुमच्याकडे ठेवा.(स्रोत-दैनिक नजरकैद)
Share your comments