कोरोना मुळे बऱ्याच तरुणांचा रोजगार गेला आहे आणि बर्याच ठिकाणी नोकर कपात करण्यात आली आहे. नोकर कपात आणि काही ठिकाणी वेतन कपात त्यामुळे तरुणाई होरपळून निघत आहे. त्यामुळे तरुण आत्ता विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी च्या शोधात आहेत. अशातच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकूण सात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस या पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठाने नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://www.vnmkv.ac.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. संबंधित पदांसाठीची मुलाखती 3-6-2021 रोजी होणार आहे.
जागा निहाय पदसंख्या
- वरिष्ठ संशोधन सहकारी – एकूण दोन जागा
- प्रकल्प सहाय्यक – एकूण दोन जागा
- कुशल मदतनीस – एकूण तीन जागा
या भरतीसाठी असलेली पदनिहाय शैक्षणिक पात्रता
- वरिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी - कृषी क्षेत्रात एम एस सी (msc) आवश्यक
- प्रकल्प सहाय्यक पदासाठी- कृषी क्षेत्रात बीएससी (BSC)
- कुशल मदतनीस या पदासाठी- कृषी क्षेत्रात डिप्लोमा आवश्यक आहे.
पदनिहाय दरमहा मिळणारे वेतन
- वरिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी वेतन – एकतीस हजार रुपये
- प्रकल्प सहाय्यक पदासाठी वेतन- पंधरा हजार रुपये
- कुशल मदतनिस पदासाठी वेतन- दहा हजार रुपये
Share your comments