मागच्या कोरोना काळापासून थांबलेल्या सगळ्या संरक्षण खात्यातील भरतीची वाट चातकासारखे सगळेतरुण पाहत आहेत.अशा तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. यासंबंधी गृहमंत्रालय लवकरच बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स म्हणजेच बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे.ही संबंधित भरती 2788 पदांसाठी घेण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी दोन हजार बावीस पासून बीएसएफ कॉन्स्टेबल भरती 2022भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. ज्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2022 असणार आहे.या भरतीसाठी या कुणी इच्छुक उमेदवारांना अर्ज करायचे असतील ते rectt.bsf.gov. in या संकेत स्थळावर अर्ज करू शकतात.अजून यासंबंधीची कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून अशा परिस्थितीत उमेदवारांनी अधिसूचना जारी होण्याची प्रतीक्षा करावी.
या भरती विषयी सविस्तर माहिती
लागणारी शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी दहावी पास किंवा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा दोन वर्षाचा अनुभव किंवा आयटीआय मध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा यासारखी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी मागवली जाऊ शकते जेव्हा अधिसूचना जारी होईल तेव्हा या बद्दलचे तपशीलवार माहिती उपलब्ध असेल.
वय मर्यादा
मीडिया रिपोर्टनुसार, 18 ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील.
निवड प्रक्रिया
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्रांची पडताळणी तसेच शारीरिक मानक चाचणी, लेखी चाचणी तसेच वैद्यकीय परीक्षा प्रक्रियेचे आधारे केली जाईल.
या भरतीच्या संभावित महत्त्वाच्या तारखा….
- ऑनलाईन अर्ज सुरू करण्याचीतारीख- 15 जानेवारी 2022
- ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 28 फेब्रुवारी 2022
शारीरिक चाचणी
- उंची- पुरुषांसाठी 167.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर
- छाती( केवळ पुरुषांसाठी)-न फुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगवून 81 सेंटीमीटर
डोंगरी भागातील उमेदवार
- उंची- पुरुषांसाठी 165 सेमी महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर
- छाती( केवळ पुरुषांसाठी) न फुगवता 78 सेंटीमीटर फुगवुन 83 सेंटीमीटर
अनुसूचित जाती/ जमाती आणि आदिवासी उमेदवार….
- उंची- पुरुषांसाठी 162.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेमी
- छाती( केवळ पुरुषांसाठी)-नफुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगवुन 81 सेंटीमीटर( संदर्भ-जळगावलाईव्ह)
Share your comments