"कसेल त्याची जमीन " असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्यामची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणार्याम कायदेशीर कूळाची नांवे ७/१२ च्या इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर १९४८ चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले.(१) आजच्या स्थितीत दुसऱ्याची जमीन एखाद्या व्यक्ती कायदेशीररित्या कसत असेल व सदर जमीन मालकाकडून जातीने कसली जात नसेल तर कुल निर्माण होते. जातीने म्हणजे प्रत्यक्ष कष्ट करून होय.
यातही सदर व्यक्ती अ.जमीन मालकाच्या कुटुंबातील नसला पाहिजे.ब.सदर व्यक्ती जमीन गहान घेणारा नसला पाहिजे.क.सदर व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसला पाहिजे.(२) कूळ हक्काच्या संदर्भातील दुसरी बाजू म्हणजे जमीन मालकाने स्वत:हून जमीन कसणे होय. याची व्याख्यासुध्दा कूळ कायद्यात करण्यांत आली आहे. एखादा इसम स्वत: जमीन कसतो काय, हे ठरविण्यासाठी खालील नियम लावले जातात.(अ) स्वत: अंगमेहनतीने तो जमीन कसत असेल तर.(ब) स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने जमीन कसत असेल तर, (क) स्वत:च्या देखरेखीखाली मजूरीने लावलेल्या मजूरांकडून जमीन करुन घेत असेल तर, असे मजूर कि ज्याला पैसे दिले
जात असोत किंवा मालाच्या रुपाने वेतन दिले जात असो. परंतू पिकाच्या हिश्श्याच्या रुपाने जर मजूरी दिली गेली तर तो कूळ ठरु शकतो.(३) कूळ ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे, परंतु कूळ होण्यासाठी खालील महत्वाचे घटक मानले जातात.(अ) दुसर्यासच्या मालकीची जमीन अन्य इसम वैध किंवा कायदेशीररित्या कसत असला पाहिजे.(ब) जमीन मालक व कूळ यांच्यात तोंडी का होईना करार झाला असला पाहिजे व तोंडी करार कोर्टात सिध्दा झाला पाहिजे.(क) असा इसम प्रत्यक्ष जमीन कसत असला पाहिजे व त्या बदल्यात तो मालकाला खंड देत असला पाहिजे.(ड) जमीन मालक व कूळ यांच्यात पारंपारिकरित्या जपलेले मालक व कूळ असे विशिष्ठ सामाजिक नाते असले पाहिजे.
दुसर्यामची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन १९३९ च्या कूळ कायद्यानुसार सर्वप्रथम जमीनीत असणार्याम कायदेशीर कूळाची नांवे ७/१२ च्या इतर हक्कात नोंदली गेली. त्यानंतर १९४८ चा कूळ कायदा अस्तित्वात आता. त्याने कूळांना अधिक अधिकार प्राप्त झाले.(१) आजच्या स्थितीत दुसऱ्याची जमीन एखाद्या व्यक्ती कायदेशीररित्या कसत असेल व सदर जमीन मालकाकडून जातीने कसली जात नसेल तर कुल निर्माण होते. जातीने म्हणजे प्रत्यक्ष कष्ट करून होय.
Share your comments