नवी दिल्ली : राम मंदिरासंदर्भात मोठी बातमी! अयोध्येतील (Ayodhya) राममंदिराची (Ram Mandir) तारीख ठरलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीच राममंदिराच्या तारखेसंदर्भात मोठी घोषणा केलीय. त्रिपुरात एका सभेवेळी त्यांनी बोलताना म्हटलं की, अयोध्येत पुढच्या वर्षी १ जानेवारीला भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येईल.
राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसनं झुलवत ठेवला, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. राममंदिरासंदर्भात काँग्रेस फक्त कोर्टकचेऱ्यांमध्ये गुंतून राहिलं. पण सुप्रीम कोर्टाचा राममंदिराबद्दलचा निर्णय येताच पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलं. आणि आता 1 जानेवारी 2024 मध्ये राममंदिर प्रत्यक्षात येणार आहे.
निवडणुकांच्या प्रचार सभांमध्येही हा प्रश्न उपस्थित केला जायचा. असंही अमित शहा म्हणाले. तसंच काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचे काम वेगाने पुढे नेले.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नात 700 जणांना विषबाधा
असं असेल राम मंदिर
भव्य राम मंदिरात एकूण 12 दरवाजे असतील. हे सर्व दरवाजे सागवान लाकडाचे असतील. जानेवारी 2024 पासून भाविकांना रामललाचे भव्य मंदिरात दर्शन घेण्यास सुरुवात होणार आहे. मंदिराच्या गर्भगृहात 160 खांब बसवण्यात आले आहेत. जो मंदिराचा आधार असेल.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 132 खांब असतील. त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावर 74 खांब बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत राम मंदिराच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.
राम लल्लाच्या गर्भगृहाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. अष्टकोनी गर्भगृहात आतापर्यंत पाचशे मोठमोठे दगड टाकण्यात आले आहेत.गर्भगृह तयार करण्यात सुमारे 500 कारागीर आणि मजूर गुंतले आहेत.
अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Share your comments