1. इतर बातम्या

Central Goverment New Rule: केंद्र सरकारने 'या' कर्मचाऱ्यांना आजपासून केला नवीन नियम लागू, वाचा तपशील

केंद्र सरकारचे बरेच कर्मचारी असून केंद्र सरकारने केलेले नियम त्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वेचे देखील कर्मचारी येतात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून म्हणजे रेल्वे कर्मचार्यांच्या जो काही बदलीचा प्रश्न आहे तो आता एकदम सहजगत्या होणार आहे म्हणजे रेल्वे बोर्डाकडून एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
new railway decision of employee transfer

new railway decision of employee transfer

केंद्र सरकारचे बरेच कर्मचारी असून केंद्र सरकारने केलेले नियम त्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वेचे देखील कर्मचारी येतात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून म्हणजे रेल्वे कर्मचार्‍यांच्या जो काही बदलीचा प्रश्न आहे तो आता एकदम सहजगत्या होणार आहे म्हणजे रेल्वे बोर्डाकडून एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.

नक्की वाचा:EPFO Scheme: 'ईपीएफओ' धारकांना 'या' योजनेच्या माध्यमातून मिळते 7 लाख रुपयांचे विमा संरक्षण,वाचा या विषयी

आज पासून या निर्णयाची देशभरात अंमलबजावणी करण्यात आली असून रेल्वेकडून ज्या काही वेगळ्या प्रकारच्या बदल्या होतात. ज्या विभागात कर्मचारी काम करतात अशा  विभागात कर्मचाऱ्यांची बदली होते मात्र एखाद्या कर्मचार्‍याला जर आंतर विभागीय बदली जायचे असेल तर यामध्ये फार मोठी समस्या निर्माण होते.

यासाठी एखादा मॅच्युअल बदली करायला कर्मचारी मिळाला तर ही गोष्ट शक्य होते. या व अशा अनेक समस्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीचे संबंधित होत्या. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आजपासून ट्रान्सफर मॉडेल लागू केले आहे.

नक्की वाचा:7th Pay Commission: सणासुदीच्या मुहूर्तावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'ही' आहे आनंदाची बातमी, वाचा तपशील

काय आहे नेमकं हे ट्रान्सफर मॉड्युल?

 हे मॉड्युल सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी हे मॉड्यूल तयार केले असून त्याला एचआरएमएस असे नाव देण्यात आले असून याबाबतीत रेल्वे बोर्डाच्या म्हणण्याचा विचार केला तर आता आंतर विभागीय बदली चे सर्व अर्ज याद्वारे दाखल केले जातील व त्यांच्या बदलीचा अर्ज प्रलंबित आहे तो देखील अर्ज या वर अपलोड केला जाईल. याबाबतीत रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे की,यामुळे आता बदलीची जी काही प्रक्रिया आहे

ती पारदर्शक व जेव्हा कोणत्याही कर्मचार्‍यांच्या बदल्याची वेळ येते तेव्हा तो एचआरएमएस मध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतील.

एवढेच नाहीतर सुपरवायझर, ब्रँच ऑफिसर आणि कर्मचारी विभागाचे अधिकारी देखील कर्मचाऱ्यांचे जे काही बदलीचा अर्ज येतील त्याच्यावर आपले मत नोंदवू शकतील. परंतु बदलीचा अंतिम निर्णय फक्त डीआरएम किंवा एडीआरएमचाच असेल.

नक्की वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होण्याची शक्यता,मिळेल दिलासा

English Summary: railway ministry take important decision about employees transfer matter Published on: 15 August 2022, 06:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters