केंद्र सरकारचे बरेच कर्मचारी असून केंद्र सरकारने केलेले नियम त्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक असतात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये रेल्वेचे देखील कर्मचारी येतात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने भारतीय रेल्वेचा कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली असून म्हणजे रेल्वे कर्मचार्यांच्या जो काही बदलीचा प्रश्न आहे तो आता एकदम सहजगत्या होणार आहे म्हणजे रेल्वे बोर्डाकडून एक निश्चित धोरण तयार करण्यात आले असून रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
आज पासून या निर्णयाची देशभरात अंमलबजावणी करण्यात आली असून रेल्वेकडून ज्या काही वेगळ्या प्रकारच्या बदल्या होतात. ज्या विभागात कर्मचारी काम करतात अशा विभागात कर्मचाऱ्यांची बदली होते मात्र एखाद्या कर्मचार्याला जर आंतर विभागीय बदली जायचे असेल तर यामध्ये फार मोठी समस्या निर्माण होते.
यासाठी एखादा मॅच्युअल बदली करायला कर्मचारी मिळाला तर ही गोष्ट शक्य होते. या व अशा अनेक समस्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीचे संबंधित होत्या. त्यामुळे रेल्वे कर्मचार्यांच्या समस्या दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने आजपासून ट्रान्सफर मॉडेल लागू केले आहे.
काय आहे नेमकं हे ट्रान्सफर मॉड्युल?
हे मॉड्युल सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी हे मॉड्यूल तयार केले असून त्याला एचआरएमएस असे नाव देण्यात आले असून याबाबतीत रेल्वे बोर्डाच्या म्हणण्याचा विचार केला तर आता आंतर विभागीय बदली चे सर्व अर्ज याद्वारे दाखल केले जातील व त्यांच्या बदलीचा अर्ज प्रलंबित आहे तो देखील अर्ज या वर अपलोड केला जाईल. याबाबतीत रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे की,यामुळे आता बदलीची जी काही प्रक्रिया आहे
ती पारदर्शक व जेव्हा कोणत्याही कर्मचार्यांच्या बदल्याची वेळ येते तेव्हा तो एचआरएमएस मध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतील.
एवढेच नाहीतर सुपरवायझर, ब्रँच ऑफिसर आणि कर्मचारी विभागाचे अधिकारी देखील कर्मचाऱ्यांचे जे काही बदलीचा अर्ज येतील त्याच्यावर आपले मत नोंदवू शकतील. परंतु बदलीचा अंतिम निर्णय फक्त डीआरएम किंवा एडीआरएमचाच असेल.
Share your comments