मुंबई: रॉयल एनफील्ड (Royal Enfield Bullet) इंटरसेप्टर 650 ही रॉयल एनफिल्डची एक दमदार क्रूझर बाइक आहे. या सेगमेंटमधील ही एक सर्वोत्तम बाइक आहे. ही बाईक तिच्या मजबूत इंजिन आणि उत्कृष्ट डिझाइनमुळे लोकांच्या पसंतीस खरी उतरत आहे. या बाईकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स कंपनीद्वारे दिले गेले आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या बाईकचे व्हेंचुरा ब्लू हा प्रकार खरेदी करण्यासाठी सुमारे 2,82,970 खर्च करावे लागतात. असे असले तरी या बाइकची ऑन-रोड किंमत 3,28,877 रुपयापर्यंत पोहोचते. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा एका भन्नाट ऑफरविषयी सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही फक्त 33 हजार रुपयात रॉयल इन्फिल्डची ही दमदार बाइक घरी घेऊन जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या बाईकवर उपलब्ध असलेल्या एका फायनान्स सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याचा फायदा घेऊन आपण ही बाईक कमी किंमतीत मिळवू शकता.
Royal Enfield Interceptor 650 Finance Plan: मित्रांनो तुम्हाला रॉयल एनफिल्डची ही बाईक खरेदी करायची असेल मात्र पुरेसा पैसा उपलब्ध नसेल तर आपण ही बाईक फायनान्सने खरेदी करू शकता. ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 व्हेंचुरा ब्लू व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी बँकेकडून 2,95,877 चे कर्ज मिळु शकते. म्हणजे तुम्हाला कमीत कमी ₹33,000 डाऊन पेमेंट म्हणून भरावे लागणार आहेत. डाऊन पेमेंट भरल्यानंतर बँकेकडून उर्वरित पैसे कर्ज म्हणुन दिले जातील. यानंतर दरमहा ₹9,001 चा मासिक हफ्ता EMI म्हणून बँकेला परतफेड करावी लागणार आहे. हे कर्ज तुम्हाला 3 वर्षांच्या कालावधीत परत करावे लागणार आहे. बँक कर्जावर वार्षिक 9.8 टक्के दराने व्याज आकारते.
Royal Enfield Interceptor 650 चे स्पेसिफिकेशन्स:
Royal Enfield Interceptor 650 Ventura Blue या बाईकमध्ये कंपनीने एअर कूल्ड ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित इंजिन दिले आहे. या बाईकमध्ये, तुम्हाला 2 सिलेंडर्ससह 648 cc चे इंजिन मिळते, ज्यामध्ये 47.65 PS कमाल पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. कंपनी या इंजिनसह या बाईक मध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स प्रदान करते. कंपनीने या बाईकच्या पुढील चाक आणि मागील चाक दोन्हीमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, तसेच या बाईकमध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिली आहे. ही बाईक 31.95 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.
Share your comments