1. इतर बातम्या

लोन घ्यायचे? काही मिनिटांमध्ये कागदपत्रांशिवाय खात्यावर येतील कर्जाचे पैसे,'या'बँकेची सुविधा

बँकेकडून एखादे लोन घ्यायचे म्हटले म्हणजे अगोदर डोक्यामध्ये खूप विचारांचे चक्र सुरु होते. कारण आपल्याला सगळ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याच्या बाबतीत अनुभव आलेला असतो. कर्ज मिळवण्यासाठी ची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
punjaab national bank give loan in use few east steps and get loan

punjaab national bank give loan in use few east steps and get loan

 बँकेकडून एखादे लोन घ्यायचे म्हटले म्हणजे अगोदर डोक्यामध्ये खूप विचारांचे चक्र सुरु होते. कारण आपल्याला सगळ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याच्या बाबतीत अनुभव आलेला असतो. कर्ज मिळवण्यासाठी ची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची असते.

विविध कागदपत्रांची पूर्तता तर करावीच लागते परंतु पैसे मिळेपर्यंत बँकेच्या फेऱ्या मारून  वैताग यायचे काम होते. परंतु जर कुठल्याही कागदपत्रांशिवाय अगदी काही मिनिटांमध्ये खर्चाचे पैसे जर तुमच्या खात्यावर जमा झाले तर किती छान होईल.

हीच कल्पना आता एका बँकेने पुढे आणली असून तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीच्या काळात  पंजाब नॅशनल बँक अगदी सोप्या मार्गाने आणि पद्धतीने कर्ज देऊ शकते. याबाबत या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज

 पंजाब नॅशनल बँकेची कर्ज सुविधा  

 तुम्ही जर पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. बँकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने या बँकेकडून कर्ज मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला काही मोजक्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल.

हे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जाचे पैसे अगदी काही मिनिटात  तुमच्या खात्यावर  जमा केले जातील. या बँकेकडून pre-approved लोन ग्राहकांना ऑफर केले जात असून यासाठी फक्त एक ओटीपी आवश्यक असून त्यानंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.

बँकेने यासंबंधीची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील दिली असून  बँकेचे ट्विटचा आधार घेतला तर ओ टी पी नंतर ग्राहक फक्त चार क्लिकमध्ये कर्ज घेऊ शकतात. फक्त तुम्हाला यासाठी बँकेच्या पीएनबी वन ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतरच्या पायऱ्या…

नक्की वाचा:PKVY:'या' योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मिळतील 50 हजार रुपये, वाचा या योजनेविषयी सविस्तर

1- या ॲपच्या होम पेजवर असलेला ऑफर चा पर्याय निवडावा लागेल.

2- सर्व तपशील व्हेरिफाय केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा.

3- तुम्हाला किती कर्ज हवे आहे त्याची रक्कम स्क्रीनवर टाकावी लागेल.

4- बँकेच्या त्याबाबत असलेल्या अटी वाचल्यानंतर एक्सेप्ट आणि प्रोसीड वर क्लिक करावे लागेल.

5- त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी  प्राप्त होईल तो इंटर करावा लागेल.

6- तुम्ही ओटीपी सबमिट करता तुमचे लोन साठी केलेल्या अर्जाची प्रोसेस पूर्ण होईल.

नक्की वाचा:'या' योजनेच्या साथीने शेळीपालन व्यवसाय घेईल उंच उंच भरारी, या योजनेचा घ्या लाभ, फुलवा शेळीपालन व्यवसाय

English Summary: punjaab national bank give loan in use few east steps and get loan Published on: 07 July 2022, 09:18 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters