प्रत्येक जण भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी,मुलांची लग्न तसेच स्वतःच्या निवृत्तीनंतर भक्कम आर्थिक आधार राहावा यासाठी बरेच जण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. कारण प्रत्येकाची अपेक्षा असते की, केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळावा व आपली गुंतवणूक सुरक्षित राहावे ही होय. त्यासाठी आपण या लेखामध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेची माहिती घेणार आहोत, जिला पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे म्हणतात.
काय आहे पब्लिक प्रोविडेंट फंड?
या योजनेतील तुमची गुंतवणूक करमुक्त असून यामध्ये तुम्ही जमा केलेल्या पैशांवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही व यामध्ये पैसे खुप सुरक्षित राहतात. एवढेच नाहीतर केलेल्या गुंतवणुकीवर जे काही व्याज मिळते ते देखील करमुक्त आहे.
तसेच परिपक्वता कालावधीनंतर मिळणाऱ्या पैशांवर देखील कुठल्याही प्रकारचा कर लागत नाही. म्हणजेच याचा अर्थ योजना संपूर्ण करमुक्त आहे. एवढेच नाही तर तुम्हाला जर कर वाचवायचा असेल तर तुम्ही या योजनेवर कपातीचा फायदा देखील मिळवू शकतात.
या योजनेचे एकंदरीत स्वरूप
या योजनेचा वार्षिक व्याजदर 7.1 टक्के असून दर महिन्याला व्याज हे मोजले जाते. या योजनेमध्ये तुम्हाला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते.
जर पंधरा वर्षांनंतर देखील तूम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही यामध्ये पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये दोनदा या योजनेचा कालावधी वाढवू शकतात. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती वार्षिक कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त दीड लाख रुपये एवढी करता येते.
अशा पद्धतीने तुम्ही एक कोटी रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतात
जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करून एक कोटी रुपये जमा करायचे असतील तर तुम्हाला दररोज चारशे 17 रुपये एवढी गुंतवणूक करावी लागेल किंवा दर महिन्याला साडेबारा हजार रुपये गुंतवावे लागतील.
या हिशोबाने जर विचार केला तर वर्षाला दीड लाखापेक्षा थोडी जास्त गुंतवणूक या योजनेत करावी लागते. या योजनेचा 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचे एकूण 40 लाख 58 हजार रुपये जमा होता. तसेच या योजनेचा कालावधी 5 वर्षाच्या ब्लॉक मध्ये दोनदा वाढवावा लागेल.
जर तुम्ही वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि त्यांच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत तुम्हाला मॅच्युरिटी वर मिळणारी रक्कम ही एक कोटी 3 लाख असेल.
या योजनेच्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तब्बल 66 लाख रुपये व्याज म्हणून मिळतील व पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जी काही जमा केलेली रक्कमअसेल ती 36 लाख रुपये असेल. या योजनेसाठी जर तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करायचे असतील महिन्याच्या सुरुवातीला एक ते पाच तारखेचा दरम्यान करावी लागतात.
नक्की वाचा:Scheme: 'या' शेतकऱ्यांना मिळते विहीरीसाठी अनुदान,वाचा योजनेबद्दल महत्वाची माहिती
Share your comments