भारत हा कृषिप्रधान देश आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमधील फळे प्रसिद्ध आहेत जसे नागपूरची संत्रा नाशिकची केळी रत्नागिरी हापूस अशा प्रकारची. पण आपल्या जळगावची केळी थेट परदेशात रवाना झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव मधल्या तांदलवाडी येथील शेतकऱ्याने केळीचे उत्पादन घेतले आहे.
गावामध्ये बरेच लोक हे केळीचे उत्पादन घेतात:
महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा मधून तांदलवाडी गाव येथून वीस मेट्रिक टन कंटेनर नुकताच दुबई ला रवाना झाला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातील जळगावातील शेतकरी आहे परदेशाच्या बाजारपेठेकडे पावले टाकत आहेत. महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये तांदळवाडी हे छोटेसे गाव आहे.जवळपास सुमारे तीन हजार लोक लोक या गावांमध्ये राहतात. या तांदलवाडी गावामध्ये बरेचशे लोक हे केळीचे उत्पादन घेतात.यात तांदलवाडी गावातले शेतकरी अशा पद्धतीने केळीचे उत्पादन घेतात की एका वर्षासाठी 370 कंटेनर म्हणजेच सात ते साडे सात हजार मेट्रिक टन केळी ही परदेशामध्ये जायला हवी.
हेही वाचा:भारत की पाकिस्तान, नक्की कोणाचा आहे हा बासमती तांदूळ
जेवढ काय उत्पादित केळीच्या लागवडीने माल झाला आहे तेवढ्या माला पैकी काही माल देशा स्तरिय बाजारपेठेत दिला जातो व उर्वरित माल परराष्ट्रीय बाजारपेठे मध्ये दिला जातो. यामध्यध्ये म्हणजेच परराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये माल देणे या सगळ्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल नेहमी होत असत.या तांदुलवाडी गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जी आय मानांकन केळीचे परदेशात म्हणजे दुबईला रवाना केली आहे. इथून मागे फक्त केळी परदेशात रवाना होत होती पण त्यांना जि आय मानांकन नव्हतं.
प्रशांत महाजन हे असे पहिले शेतकरी आहेत की त्यांच्या केळीच्या मालाला जी आय टॅग लागून त्यांनी परदेशात त्यांच्याखेरीज मालाची निर्यात केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.यामुळे एक केळीच्या लागवडीसाठी अनेक शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा मिळाली. त्यामुळे तेथील शेतकरी अजून जोमाने केळीची लागवड करत आहे.
Share your comments