1. इतर बातम्या

Profitable Small Business Idea: 'हे' व्यवसाय सुरु करा आणि कमवा महिन्याकाठी हजारो

अलीकडे अनेक सुशिक्षित युवक (Well-educated youth) नोकरीऐवजी व्यवसाय करण्याचे स्वप्न बघत असतात. अनेक युवकांना हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा स्वतः मालक म्हणून व्यवसाय करायला आवडते. मात्र असे असले तरी अनेक युवकांना व्यवसायाची योग्य ती माहिती नसल्याने व्यवसाय सुरू करण्यात अडचण येत असते तसेच अनेक युवक पुरेसे भांडवल (Sufficient capital) नसल्याने व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. आज आम्ही युवकांची हीच समस्या हेरून कमी भांडवलात सुरू करता येऊ शकणारे व्यवसायांची (Businesses that can be started with low capital) माहिती घेऊन आलो आहोत. हे व्यवसाय सुरू करून आपण देखील लाखो रुपये कमवू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता चालू ठेवू या या बिजनेस विषयी सविस्तर माहिती. जर आपण ग्रामीण भागात वास्तव्यास (Living in rural areas) असाल तर आम्ही सांगितलेले व्यवसाय आपणासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपण आपल्या गावात राहून देखील व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई देखील करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
business ideas

गावात सुरू करता येणारे व्यवसाय (Businesses that can be started in the village)

सायबर कॅफे /ऑनलाइन काम

जर आपण गावात राहत असाल तर सायबर कॅफे (Cybercafe) टाकून चांगली मोठी कमाई करू शकता. जर आपल्याकडे आवश्यक संगणक ज्ञान (Required computer knowledge) असेल तर आपण हा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी आपणास जास्त इन्व्हेस्टमेंट (Investment) करावी लागत नाही, या व्यवसायासाठी आपणास एका छोट्याशा ऑफिसची आवश्यकता असते यासाठी आपण आपल्या घराचा देखील वापर करू शकता किंवा आपण भाडेतत्वावर गावातील एखादी जागा घेऊ शकता आणि या व्यवसायाला सुरुवात करू शकता.

जागेव्यतिरिक्त या व्यवसायासाठी आपणास कॉम्प्युटरची (Computer) आवश्यकता भासेल, तसेच ज्या ठिकाणी आपण आपले ऑफिस सुरू करणार आहातत्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असणार आहे. एकंदरीत या व्यवसायासाठी एक कॉम्प्युटर, एक प्रिंटर, तसेच ऑफिस साठी इतर साहित्य लागणार आहे. हा व्यवसाय आपण एक लाखाच्या आत सुरू करू शकता. जर आपल्याकडे एवढी  रक्कम उपलब्ध नसेल तर आपण कॉम्प्युटर हे इंस्टॉलमेंट वरती देखील विकत घेऊ शकता. यामुळे आपणास कम्प्युटर साठी लागणारे संपूर्ण रक्कम एका वेळी भरावी लागणार नाही.

आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड

मित्रांनो जर आपल्याकडे शेती असेल तर आपण आपल्या शेतीत मेडिसिनल म्हणजेच आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड (Cultivation of Ayurvedic plants) करून चांगली मोठी कमाई करू शकता. आपल्याकडे शेती नसेल तरीदेखील आपण भाडेतत्त्वावर शेत जमिन घेऊन आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करू शकता. आयुर्वेदिक वनस्पतींना अलीकडे मोठी मागणी आहे (Ayurvedic plants are in great demand lately) त्यामुळे हा एक प्रॉफि्टेबल व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. आपण तुळसी, गीलोय, लेमनग्रास, एलोवेरा, आवळा, यांसारख्या विविध औषधी वनस्पतींचे लागवड करून मोठे उत्पन्न कमवू शकता. यासाठी आपणास जास्त इन्वेस्टमेंटची गरज भासणार नाही, मात्र कुठल्याही वनस्पतीची लागवड करण्याआधी तज्ञांचा सल्ला (Expert advice) महत्त्वाचा ठरेल.

English Summary: profitable business idea for youngster start these business and earn extra income Published on: 02 January 2022, 08:25 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters