केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांसाठी E-shram कार्ड सुरू केले आहे.जेणेकरून कामगारांसाठी सुरू केलेल्या योजनांचा लाभ प्रथमत्यांना मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे.हेकार्ड कसे बनवावे याबद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.
E-shram कार्ड कसे बनवावे?
- सर्वप्रथम https://eshram.gov.in/या संकेतस्थळावर जाऊन सेल्फ रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे.
- त्यानंतर आधार सोबत लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल त्या ओटीपी द्वारे लॉग इन करावे.
- त्यानंतर तुमचा आधार नंबर भरावा आणि ओटीपी द्वारे प्रोसेस मध्ये पुढे जावे.आता तुमची माहिती पुढे येईल ते एक्सेप्ट करा.
- यानंतर पुढे विविध प्रकारचे फॉर्म भरावे लागतील. ज्यामध्ये पहिल्या फार्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल आणि त्यानंतर रेसिडेन्शिअल डिटेल चा फॉर्म भरावा लागतो.
- यामध्ये दुसऱ्या राज्यातील असलेल्या लोकांसाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत.
- त्यानंतर तुमच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती भरावी व सेव्ह करत पुढे जावे. नंतर ऑक्युपेशन अँड स्किल्स चा फॉर्म असेल. या ऑप्शन मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात त्याची निवड करावी.जर तुम्ही पोर्टल वर दिलेल्या यादी तुमच्या कामाचे शत्र शोधू शकत नसाल तर तेथील पीडीएफ द्वारे सुद्धा वर केले शोधू शकता आणि त्याचा कोड कॉपी करून त्यामध्ये भरू शकता.या पीडीएफ मध्ये वर केल्याची माहिती हिंदी आणि इंग्रजीत मिळते.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाऊंटची माहिती भरावी लागते.त्यानंतर ओके केल्यावर आपल्याकडून भरलेली सर्व माहिती मिळते. योग्यरीत्या तपासून तुम्ही ओके करू शकता व नंतर ओटीपी मिळतो व त्यानंतर ओटीपी टाकल्यानंतर तुमचं कार्ड स्क्रीनवरयेईल, ज्यामध्ये तुमचा क्यूआर कोड असतो.
या पोर्टल चा उपयोग
ईश्रम पोर्टलच्या मदतीने मजुरांचे अचूक आकडे आणि माहिती मिळवता येईल व त्याद्वारे मजुरांसाठी योजना आणि नियम बनवले जातील.याद्वारे सरकारला ठरवता येईल की योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या कसा पोहोचावा.
स्त्रोत- पोलीस नामा
Share your comments