सध्या सोलर एनर्जीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कमाई करण्याचे हे एक उत्तम स्रोत आहे. देशाचाही विकास करायचा असेल तर आपण या एनर्जीचा उपयोग केला पााहिजे. ऊर्जा स्रोतमध्ये सोलर स्रोत हे एक मस्त पर्याय असून यातून कमाई होऊ शकते. याचे सर्वात आकर्षक विशेषता म्हणजे सोलर पॅनल तुम्ही कुठेही स्थापित करु शकता. याला इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा विजेचा प्रश्न कायमचा मिटून जाईल. जर आपण सोलर पॅनल बसविण्याचा विचार करत असाल तर सरकार तुम्हाला अनुदान देखील देत आहे. हे अनुदान केंद्र सरकारच्या न्यू एंड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालय, रुफटॉप सोलर प्लांटवर ३० टक्के अनुदान देते. जर आपण विना अनुदान सोलर पॅनल बसवला तर आपल्याला साधऱण १ लाख रुपये खर्च येऊ शकतो.
सोलर पॅनलचे अनेक फायदे आहेत, वाढत्या महागाईत विजेचे दरही वाढत आहेत याचा परिणाम नागिरकांच्या बजटमध्ये होत असतो. आपल्याला दर महिन्याला विजेचे भरभक्कम बील द्यावे लागते. जर आपण सोलर पॅनल घरावर बसवला तर आपला घर खर्चातील मोठी रक्कम वाचू शकते. हे सोलर पॅनल आपण आपल्या घराच्या गच्चीवर बसवू शकतात. फक्त आपल्या घरावर सूर्य प्रकाश चांगल्या प्रकारे पोहचत असेल तर गच्चीवर सोलर पॅनल लावून मोठ्या प्रमाणात विज उत्पादित करु शकतात. दरम्यान मोदी सरकार २०२२ पर्यंत ग्रीन एनर्जींचं उत्पादन १७५ गीगावॅट पर्यंत करण्याचा निर्धार करत आहे. यामुळे आपल्याला नव्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून सोलर सिस्टम लावल्यानंतर अनुदान देखील मिळू शकते.
जाणून घ्या कशाप्रकारे वाचेल आपला पैसा
सोलर पॅनली किंमत साधऱण १ लाख रुपय आहे. जर आपण आपल्या घराच्या गच्चीवर दोन किलोवॅटचं सोलर पॅनल इन्स्टॉल कराल, तर दिवसाच्या १० तासात सूर्यप्रकाश मिळाल्यास यातून साधरण १० यूनिट विज बनेल. जर आपण महिन्याचा हिशोब लावला तर दोन किलोवॅटचा सोलर पॅनल ३०० यूनिट विज तयार करेल.
या पद्धतीने खरेदी करा सोलर पॅनल -
सोलर पॅनलची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटीशी संपर्क करू शकता. राज्याच्या प्रमुख शहारांमध्ये कार्यालय बनविण्यात आली आहेत,तेथे आपण संपर्क करू शकता. प्रत्येक शहरात खासगी डीलर्सकडेही सोलर पॅनल उपलब्ध आहेत.अथॉरिटीकडून कर्ज घेण्यासाठी आधी संपर्क करणे आवश्यक आहे. सब्सिडीसाटी एक अर्जही अथॉरिटी कार्यालयात मिळेल.
१० वर्ष चालेल बॅटरी -
सोलर पॅनलचे आयुष्य २५ वर्षापर्यंत असत. याशिवाय सोलर पॅनलला मेंटनेस देखभालीचा खर्च येत नाही. परंतु दहा वर्षांमध्ये एक बॅटरी बदलावी लागते. याचा खर्च साधरण २० हजार रुपये असतो. सोलर पॅनलला एका जागेहून दुसऱ्या जागेवर सहज आणता येते.
या गोष्टींचं ठेवा लक्ष-
- या सोलर पॅनल आपण स्वताच्या वापरासाठी करत आहोत याचा अर्ज द्यावा.
- आपण सोलर पॅनल बनणारे विज इलेक्ट्रिसिटी ग्रीडमध्ये देत आहोत.
- आपल्या घरात येणारी विज ही त्याच पद्धतीने येत राहिल.
- अनेक राज्य सरकारांनी यासाठी ग्रुप नेट मीटरिंग आणि वर्चुअल नेट मीटरिंग फ्रेमवर्क बनवले आहे.
- आपल्या घराला आणि को - ऑपरेटिव्ह ग्रुप हाऊसिंग सोसायटीला कमी दरात विज उपलब्ध होते.
Share your comments