1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मोदींनी जनतेला संबोधित केले.सध्या कोरोना महामारी मुळे जगासमोर अनेक प्रकारचे आव्हान उभे ठाकले आहेत.
कोरोना अगोदर जग जसे होतेतसा आता राहणार आहे. देशाचा डिजिटल रुपया कसा असेल? याबाबत आता चर्चा होत आहे. हा डिजिटल रुपया रोख रकमेत कसा बदलता येईल यासंबंधी पंतप्रधानांनी सांगितले.सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलना बाबत ही सध्या बरीच चर्चा होत आहे.त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. हा डिजिटलरुपया आपल्या सध्याच्या चलनाप्रमाणेच असेल व यावर आरबीआय लक्ष ठेवणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था असेल ज्याला फिजिकल करन्सी सोबत बदलता येईल.
जरा तुम्हाला कोणी डिजिटल चलणांमध्ये पैसे देत असेल तर तुम्ही त्याला रोख स्वरूपात बदलू शकता. यामुळे डिजिटल पेमेंट, ऑनलाइन पेमेंट,रिटेल पेमेंट अधिक सुरक्षित होईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम असणार नाही.या डिजिटल रुपयामुळे फिनटेक क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध होतील.यामुळे रोख रक्कम छापणे व त्याची हाताळणी आणिविचारणा वरील भार कमी होईल असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारताने कोरोना महामारी चा देखील तत्परतेने साधना केला आहे त्यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.भारताला अजून मजबूत बनावी अशी जगाची अपेक्षा आहे.त्यामुळे आपल्या देशाची वाटचाल वेगाने करणे हे महत्त्वाचे आहे. नवीन संधीचे सोने करण्याची व स्वावलंबी बनण्याची हीच वेळ आहे असेही पंतप्रधान म्हणाले.(स्रोत-सकाळ)
Share your comments