केंद्र सरकारने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजनेविषयी मिश्र प्रतिक्रिया आहेत. काही राज्यातील सरकारांनी ही योजना बंद केली आहे. महाराष्ट्रातही या योजनेविषयी काहीसा नकारात्मक वातावरण होते, परंतु या वर्षाच्या खरीप हंगामात हे चित्र बदलले आहे. राज्यातून या पीक विमा योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा अर्ज प्राप्त झाले. ही संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे.
काय आहे पंतप्रधान पीक विमा योजना
ही योजना केंद्र सरकारने वर्ष २०१६ मध्ये सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून पिकांच्या झालेल्या नुकसानीवर सरकार शेतकऱ्यांना भरपाई देत असते. नैसर्गिक आपत्ती किंवा पेरणी झाल्यानंतर पीक न उगवल्यास आदी नुकसानीवर सरकार शेतकऱ्यांना भरपाई देते. राज्यातील अनेक जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारे ही योजना राबवली जाते याची माहिती आपण घेणार आहोत.
पंतप्रधान पीक विमा योजनेत आपण महाराष्ट्राच्या विभागानुसार माहिती घेणार आहोत.
१) कोकण विभाग
कोकण विभागात खरीप हंगामासाठी भात ( तांदूळ) आणि नाचणी, उडीद ही पिके समाविष्ट करण्यात आली आहेत.
खालील तक्त्यामध्ये तुम्हाला पिके, एकूण विम्याची रक्कम, शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकार याचा हिस्सा दिला आहे.
२) उत्तर महाराष्ट्र विभाग
उत्तर महाराष्ट्र विभागात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला.
या जिल्ह्यांमधील खरीप हंगामासाठी, भात, तांदूळ, ज्वारी, बाजरी नाचणी भुईमूग सोयाबीन, कारळे, मुग, उडीद, तूर, मका, कापूस कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
३) पश्चिम महाराष्ट्र विभाग
पश्चिम महाराष्ट्र विभागात अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यात खरीप हंगामांसाठी, भात, बाजरी, भुईमूग,सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका, कापूस कांदा, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा समावेश करण्यात आला आहे.
४) मराठवाडा विभाग
मराठवाडा विभागात औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातुर, उस्मामाबाद, परभणी, नांदेड या जिल्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा या पिकांचा समावेश केला आहे.
५) विदर्भ विभाग : बुलढाणा, वाशीम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला या जिल्ह्याचा समावेश होतो.
यासर्व जिल्ह्यांत खरिपाकरिता ज्वारी, सोयाबीन, मूग उडीद, तूर कापूस, मका, भात या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Share your comments