1. इतर बातम्या

प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच प्रक्रिया करा पुर्ण ; खात्यात लगेच येईल सब्सिडी

आपलं घर व्हावे असं प्रत्येकाच स्वप्न असते. परंतु आर्थिक चणचणमुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु पंतप्रधान आवास योजना पीएमएवाय तून आपण हे स्वप्न पूर्ण करू शकतो. या योजनेचा फायदा घेत आपण २ लाख ६० हजार रुपयाचे सब्सिडी मिळवू शकतो. यासाठी आपण जाणून घेऊ की, योजनेसाठी कशी नोंदणी करायची.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

 

आपलं घर व्हावे असं प्रत्येकाच स्वप्न असते,  परंतु आर्थिक चणचणमुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही.  पण  पंतप्रधान आवास योजना  पीएमएवायतून (PMAY)  आपण हे स्वप्न पूर्ण करू शकतो. या योजनेचा फायदा घेत आपण २ लाख ६० हजार रुपयाची सब्सिडी मिळवू शकतो.  यासाठी आपण  जाणून घेऊ की, योजनेसाठी कशी नोंदणी करायची.   प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय)   तून पहिल्यावेळेस घर घेणाऱ्यांना सीएलएसएस या क्रेडिट लिंक्ड सब्सिडी दिली जाते.  यात होम लोनवर कमी मिळकत असलेले नागरिक २ लाख ६० हजार रुपयांची सब्सिडी मिळवू शकतील.

या योजनेतून केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवले जातात.  योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना एनबीएफसी मध्ये अर्ज करावा लागेल.  यात एक अर्ज मिळेल, त्यात अर्जदाराला आपली वार्षिक कमाई, गुंतवणूक, मालमत्ता, दुसऱ्या अर्जदाराचे नाव वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, पत्ता, संपर्क नंबर, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे वय, धर्म , जात याची माहिती द्यावी लागेल.  योजनेचा लाभ फक्त त्यांनाच मिळेल जे ईडब्ल्यूएस च्या वर्गवारीमध्ये वर्षाला ३ लाक रुपयांपेक्षा कमी असेल. तेच एलआयजी श्रेणीसाठी वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपये असले पाहिजे. आणि एमआयजी वर्गात ही राशी १२ लाख रुपये वार्षिक होते.  अर्ज आपण https://pmaymis.gov.in/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करू शकता.  यासह सिटीजन असेसमेंट टॅबच्या अंतर्गत  बेनिफिट फॉर अदर ३ कंपोनेंट्स वर क्लिक करु मिळवू शकता. 

या योजनेसाठी आपण नोंदणी केल्यानंतर आपले नाव यादीत आले किंवा नाही हे आपण संकेतस्थळावरून जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्याला rhreporting.nic.in/netiay/benificiary.aspx वर क्लिक ककरावे लागेल.  यानंतर नोंदणी नंबर टाकावा. यानंतर संपूर्ण माहिती समोर येईल.   ज्या लोकांकडे नोंदणी नंबर नाही आहे ते एडवांस सर्च वर जाऊन त्यावर क्लिक करावे. असे केल्यानंतरत एक अर्ज येईल त्याला भरून सब्मिट करावा.  जर आपले नाव पीएमएवाय - जी च्या यादीत आहे तर आपल्या समोर सर्व माहिती येईल.  शहरात राहणारे लोक आपले नाव pmaymis.gov.in वर जाऊन चेक करु शकता.  नाव चेक करायचे असेल तर बेनेफिशिअरी सर्च मेन्यू मध्ये जावे  आता सर्च बाय नेम या  क्लिक करावे.

English Summary: pradhanmantri awas yojana : get subsidy after complet five step Published on: 19 June 2020, 06:06 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters