कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्तीवेतनधारक अर्थात पेन्शनर्स हे एकमेकांशी निगडित गोष्टी आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात एपीएफओ निवृत्तीवेतन धारकांना मिळणाऱ्या पेन्शनचे नियमन करत असते. या ईपीएफओ पेंशनधारकांसाठी देखिल वेगवेगळ्या पद्धतीचे नियम आहेत. त्यामुळे प्रत्येक पेन्शन धारकांनी त्या गोष्टींचे व्यवस्थित काटेकोर पालन करणे देखील तेवढेच गरजेचे असते.
पेन्शन धारकांचा संबंधितच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीपीओ नंबर हा होय. जर तुमचा हा नंबर हरवला तर तुमची पेन्शन सुद्धा बंद होऊ शकते.
या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर असे म्हटले जाते. पीपीओ नावाने एक वेगळा क्रमांक पेन्शनधारकांना दिला जातो.त्याआधारे पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते.
या नंबरचे महत्व
जेव्हा कर्मचारी कोणत्याही कंपनीमधून रिटायर्ड होतो अशा व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात एपीएफओ कडून एक पीपीओ क्रमांक दिला जातो. पेन्शन याशिवाय मिळू शकत नाही त्यामुळे तो असणे अत्यंत गरजेचे आहे.
समजा तुमचा नंबर हरवला असेल तर तुम्ही तोअगदी सहजपणे मिळवू शकतात.यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो. या नंबरच्या माध्यमातूनच केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाशी संपर्क साधला जातो. या नंबरच्या आधारे आपले खाते एका बॅंकेतुन दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करणे देखील सोपे जाते.
प्रत्येक निवृत्तीवेतन धारकांच्या पासबुक मध्ये हा नंबर असतो. समजा तुम्हाला तुमच्या पेंशन संबंधी काही समस्या उद्भवली असेल तर त्याच्या तक्रार दाखल करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुम्हाला पीपीओ क्रमांक देणे खूप महत्त्वाचा आहे.
नक्की वाचा:EPFO: PF खातेदारांसाठी खुशखबर! व्याजाचे पैसे मोदी सरकार 'या' दिवशी खात्यात पाठवणार...
असा अर्ज करावा
1- सगळ्यात आगोदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईट वर जावे.
2- यामध्ये केल्यानंतर ऑनलाईन सेवा या सेक्शनमध्ये पेन्शनर्स पोर्टल या पर्यायावर क्लिक करा.
3- त्यानंतर एक नवीन पेज आमच्यासमोर उघडते. या पेजवर 'नो युवर पीपीओ नंबर' वर क्लिक करावे.
4- या ठिकाणी तुमची पेन्शन ज्या बँक खात्यात येतो खाते क्रमांक टाकावा.
5- अजून इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर ती सबमीट करावी.
6- त्यानंतर लगेचच तुमचा पीपीओ नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतो.
नक्की वाचा:EPFO: PF खातेदारांसाठी खुशखबर! व्याजाचे पैसे मोदी सरकार 'या' दिवशी खात्यात पाठवणार...
Share your comments