पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून वेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आणल्या गेले आहेत.त्यामधील पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ या योजनेमध्ये तुम्ही दररोज 150 रुपये गुंतवले तर वीस वर्षाच्या नोकरी मध्ये तुम्ही वीस लाख रुपयांपेक्षा देखील जास्त निधी जमा करू शकता
.दैनंदिन खर्च मधून अनावश्यक खर्चावर लगाम घालत जर 150 रुपये वाचवले आणि हे पैसे एखाद्या छोट्या बचत योजनेमध्ये टाकला तर त्याचा मोठा फायदा मिळू शकतो.
या योजनेबद्दल सविस्तर
जर तुमचे वय 25 वर्षे असेल,तर छोट्या रकमेत मोठा परतावा मिळण्याची ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी संधी आहे.तज्ञांच्या मते,जर तुमचे उत्पन्न 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही कोणत्याही बचती व्यतिरिक्त दररोज 150 रुपये वाचू शकता. तुम्ही केलेली ही बचत तुम्हाला वयाच्या 45 व्या वर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मिळवून देऊ शकते. जेणेकरून तुम्ही तुमच्या मोठ्या घरचा असं पूर्ण करू शकत नाही.
पीपीएफ योजनेत गुंतवणुकीची माहिती
- जर तुम्ही पीपीएफ योजनेमध्ये दररोज .150 वाचविण्याच्या उद्देशाने गुंतवणूक केली तर दर महिन्याला तुम्ही चार हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक करू शकतात. जर तुम्ही प्रतिमहिन 4500 रुपये गुंतवले तर वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये असेल.
- हा हिशोब पकडला तर वीस वर्षात एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये होते 7.1 या टक्क्याने वार्षिक चक्र वाढीच्या दृष्टीने तुम्हाला वीस वर्षात वीस लाख रुपयांपेक्षा जास्त तयार निधी मिळेल.
पीपीएफ खात्याचे फायदे
- हे खाते फक्त शंभर रुपयांनी उघडता येते. तसेच या योजनेत तुम्ही जॉइंट अकाउंट ही उघडू शकता.
- जेव्हा तुम्ही खाते उघडले तेव्हा तुम्हाला नॉमिनेशन ची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंधरा वर्षाचा मॅच्युरिटी पिरेड पूर्ण केल्यानंतरही तो पाच वर्षासाठी दोन वेळा वाढवता येतो.
- यातून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. तिसरी आर्थिक वर्षापासून तुमच्या खात्यावर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.बँक, पोस्ट ऑफिस तुम्हाला पीपीएफ खाते उघडण्याची परवानगी देतात.हे खाते पंधरा वर्षासाठी उघडता येते. ज्यांची पाच वर्षासाठी वाढवता येते.
- सध्या पीपीएफ योजनेवरील व्याजदर 7.1 टक्के आहे जो दरवर्षी चक्रवाढ केला जातो. तुम्हाला कमीत कमी शंभर रुपये भरून पीपीएफ मध्ये खाते उघडता येते. एका खात्यात किमान पाचशे रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त खात्यात दीड लाख रुपये गुंतवू शकता.
टीप- कोणतीही प्रकारची गुंतवणूक करणे अगोदर गुंतवणूक तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
Share your comments