शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करून त्यातून पैसे कमवत असतो. जे शेतातून निघेल त्याची विक्री करून शेतकरी राजा आलेली रक्कम एखाद्या बँकेत किंवा त्या पैश्याची बँकेत ठेवी करतो. यामुळे काही वर्ष्यात म्हणजेच 7 ते 8 वर्ष्यात त्याच्या मोबदल्यात दामदुप्पट मिळते.शेतकऱ्याच्या फायद्यासाठी बँकेत तसेच पोस्ट ऑफिस आणि पतपेढी त्यासोबत सोसायटी यामध्ये अनेक शेतकरी फायद्यासाठी असंख्य योजना उपलब्ध आहेत. तर आज या लेखात पोस्टाने शेतकऱ्याच्या आर्थिक विकासासाठी एक जबरदस्त योजना काढली आहे त्या विषयी सविस्तर माहिती पाहू.
गरीब मध्यमवर्गीय शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात:
पोस्टाने शेतकरी वर्गाच्या गुंतवणुकीसाठी तसेच चांगला परतावा मिळावा यासाठी एक जबरदस्त योजना काढली आहे.या साठी तुम्हाला पोस्टाच्या ग्राम विकास योजनाया मध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. ग्राम विकास योजना ही शेतकरी वर्गाच्या फायद्यासाठी असल्याने शेतकरी वर्गाला गुंतवणूक करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.ग्राम विकास योजनेत तुम्ही छोटी रक्कम गुंतवुन मोठी रक्कम मिळवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत अल्प अशी रक्कम आहे त्यामुळे गरीब मध्यमवर्गीय शेतकरी याचा फायदा अगदी सहजपणे घेऊ शकतात. भविष्यासाठी ही गुंतवणूक अत्यंत चांगली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 19 ते 55 या दरम्यान असायला हवे तसेच तुम्ही भारतीय देशाचे नागरिक असणे अनिवार्य आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही 10 हजार रुपये ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच या योजनेचा हप्ता हा 3 महिने 6 महिने किंवा 12 महिने याच्या कालांतराने भरू शकता.
जर का तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर 4 वर्षा नंतर तुम्हाला कर्ज योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. जर का वयाच्या 19 व्या वर्षी तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर वयाच्या 55 वर्षा पर्यंत तुम्हाला मासिक 1515 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच दर दिवसाला तुम्हाला 50 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.जर आपण या योजनेच्या मोबदल्याबद्दल बोललो तर योजमेमध्ये गुंतवणूक करण्याऱ्या व्यक्तीला ह55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये एवढी रक्कम मीलणार आहे.
मोबदल्याची रक्कम ही त्या व्यक्तीला वयाची 80 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्याकडे दिली जाते. तर दुसरीकडे, यादरम्यान जर का एकाद्या गुंतवूकदाराचा मृत्यू झाल्यास, ही सर्व रक्कम त्या व्यक्तीच्या पुढील पिढीला दिले जाते.तसेच महत्वाचे म्हणजे ग्राम विकास योजनेच्या या पॉलिसीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्टने ऑफर केलेला बोनस आणि प्रतिवर्ष रु. 1,000 प्रति 60 रुपये निश्चित केलेला अंतिम घोषित बोनस.
Share your comments