Post Office Scheme:- आजकाल महागाई दिवसेंदिवस आकाशाला गवसनी घालत आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांचे बजेट पूर्णतः कोलमडलं आहे. अशा परिस्थितीत पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी मोठी गुंतवणूक (Investment) करणे सोपे काम राहिलेले नाही. अशा परिस्थितीत, थोडे पैसे गुंतवणूक (Money Investment) करणे हा एक चांगला पर्याय सिद्ध होणारं आहे.
पोस्ट ऑफिस (Post Office) रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना हा देखील थोड्या पैशांची गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. मित्रांनो आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, या पोस्टाच्या सरकारी योजनेला (Investment Scheme) आवर्ती ठेव असेही म्हणतात. पोस्ट ऑफिसच्या या आरडी स्कीमची खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात दर महिन्याला गुंतवणूक करू शकणार आहात. या योजनेअंतर्गत जे खाते सुरु केले जाते त्याला पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते असेही म्हणतात. याद्वारे तुम्ही 10 वर्षांत दरमहा 10,000 रुपये म्हणजेच प्रतिदिन 333 रुपयांच्या गुंतवणुकीसह एक मोठा फंड तयार करू शकणार आहात.
तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम गुंतवा
मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणतेही मूल किंवा प्रौढ व्यक्ती पोस्टाच्या या भन्नाट योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र राहणार आहे. म्हणजेचं 10 वर्षापेक्षा वयस्क कोणतेही मुलं किंवा व्यक्ती पोस्ट ऑफिस आरडीमध्ये खाते उघडू शकते. या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्ही या खात्यात फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेची सुद्धा गुंतवणूक करू शकणार आहात.
तसेच जस की तुम्हाला माहितीचं आहे की, ही योजना सरकारी हमी योजनेसह येते. यामुळे ही योजना आणि योजनेत केलेली गुंतवणूक ही पूर्णतः सुरक्षित आहे. एवढेच नाही तर या योजनेत कोणतीही कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही, म्हणजेचं तुम्ही या योजनेत तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता आणि चांगला मोठा फ़ंड आपल्या भविष्यासाठी तयार करू शकता. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या, पोस्टाच्या RD योजनेवर वार्षिक 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. हा दर जुलै 2022 पासून पोस्टाने लागू केला आहे. केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.
आरडी पाच वर्षांत परिपक्व होते
पोस्ट ऑफिस आरडी खाती पाच वर्षांनी किंवा खाते उघडण्याच्या तारखेपासून 60 वर्षांनी परिपक्व होतात. तुम्ही ही RD 10 वर्षांसाठी वाढवू शकता. तथापि, ठेवीदार तीन वर्षांनी आरडी खाते बंद करू शकतो किंवा खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. जर खाते पूर्णपणे बंद केले असेल, अगदी मॅच्युरिटीच्या एक दिवस आधी, त्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याप्रमाणेच व्याजदर लागू होईल. पोस्ट ऑफिसचे आरडी खाते पैसे जमा न करताही 5 वर्षे चालू ठेवता येते.
16 लाख रुपये कसे मिळवायचे
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये दर महिन्याला 10 हजार रुपये 10 वर्षांसाठी गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8 टक्के व्याजदराने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळतील. तुम्ही 10 वर्षांत एकूण 12 लाख रुपये जमा करणार आहात आणि तुम्हाला अंदाजे 4.26 लाख रुपये परतावा म्हणजे व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 16.26 लाख रुपये मिळतील.
Share your comments