पोस्ट ऑफिस म्हणजेच टपाल विभाग आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करत असते. जेणेकरून अधिकाधिक लोक या योजनांमध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यामध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकतील. सध्या पोस्ट ऑफिसकडून एक योजना चालवली जात आहे, ज्याचा लाभ पती-पत्नी दोघेही मिळून घेऊ शकतात.
खरं पाहता, आम्ही पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक महत्वाची योजना मंथली इन्कम स्कीमबद्दल बोलत आहोत. मित्रांनो जर तुम्हीही जोखीमविरहीत योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा विचार करू शकता. मित्रांनो पोस्ट ऑफिसची ही योजना पूर्णपणे सुरक्षित असल्याने आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया मंथली इन्कम स्कीमबद्दल.
काय आहे ही मंथली इन्कम स्कीम
मित्रांनो तुमच्या माहितीसाठी, आम्ही सांगू इच्छितो की मंथली इन्कम स्कीम ही अशीच एक योजना आहे, ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात म्हणजेच मासिक 4,950 रुपये कमवू शकतात. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती आपले खाते उघडू शकते. हे खाते सिंगल आणि जॉइंट अशा दोन्ही पद्धतीने उघडता येते.
Electric Car: एकदा चार्ज केली की 528 किलोमीटर धावते ही कार; जाणुन घ्या या कारची किंमत आणि फिचर्स
या योजनेत किती रक्कम गुंतवावी लागेल
मित्रांनो ज्या व्यक्तीला या योजनेमध्ये गुंतवणूक करायचे असेल तर तो व्यक्ती सिंगल अकाउंटमध्ये किमान 1 हजार आणि कमाल 5 लाख रुपये गुंतवू शकतो.
यासह, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात.
मंथली इन्कम स्कीमचा लाभ
या योजनेचे सर्वात मोठ वैशिष्ट्य म्हणजे या अंतर्गत 2 ते 3 लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकतात. यामध्ये सर्व सभासदांना समान रक्कम दिली जाते. तुमची इच्छा असल्यास तुम्ही कधीही संयुक्त खाते एका खात्यात रूपांतरित करू शकता.
Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी
मंथली इन्कम स्कीम कशी कार्य करते
या मंथली इन्कम स्कीमअंतर्गत, वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज दिले जातं आहे. अशा प्रकारे तुमचा एकूण परतावा वार्षिक आधारावर ठरणार आहे. प्रत्येक महिन्यानुसार त्याचे 12 भाग केले जातात.
मंथली इन्कम स्कीमचे उत्पन्न
जर एखाद्या पती-पत्नी दोघांनी मिळून संयुक्त खात्यात 9 लाख रुपये जमा केलेत. तर त्याना त्यावर 6.6 टक्के दराने व्याज मिळेल. त्यानुसार, 59,400 रुपये वार्षिक व्याज मिळेल, तर 4,950 रुपये मासिक आधारावर व्याज मिळणार आहे.
म्हणजेच, पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून दरमहा 4,950 रुपये कमवले जाऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की गुंतवणूकदाराची मूळ रक्कम पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाणार आहे. लक्षात ठेवा की ही योजना 5 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा वाढवली जाऊ शकते.
85 हजाराची 'ही' भन्नाट स्कूटर खरेदी करा मात्र 25 हजारात; जाणुन घ्या कुठं मिळतेय ही ऑफर
Share your comments