Post Office Scheme: देशातील नागरिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि म्हातारपणात पैशांची उपलब्धता राहावी यासाठी बचत आणि गुंतवणूक करण्यास अधिक भर देतो. अशा परिस्थितीत देशातील नागरिक रिस्क फ्री गुंतवणूक (Investment) करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. यासाठी एलआयसी आणि पोस्ट ऑफिस (Post Office) च्या योजना नागरिकांसाठी चांगला पर्याय सिद्ध होत आहेत.
यामुळे आज आपण देखील आपल्या वाचक मित्रांसाठी पोस्टाच्या एका योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना आहे. ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी 1995 मध्ये भारतातील ग्रामीण जनतेसाठी सुरू करण्यात आली.
तुम्ही ग्राम सुरक्षा योजनेसाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास, तुम्ही स्वतःसाठी 35 लाख रुपयांचा परतावा सुनिश्चित करू शकता. म्हणजेच या योजनेत तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये जमा केल्यास तुम्हाला 35 लाख रुपये मिळू शकतात.
ग्राम सुरक्षा योजना म्हणजे नेमक काय?
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला 35 लाखांचा पूर्ण लाभ मिळतो. गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. यामध्ये, योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचे वय 80 वर्षे पूर्ण होण्याआधी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकतो
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये किमान 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. प्रीमियम पेमेंटसाठीही अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरू शकतो.
तुम्हाला चार वर्षांनी कर्ज पण मिळेल
ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला कर्जही मिळू शकते. पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनीच कर्ज घेता येते. तसेच, तुमच्या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही वेळी प्रीमियम भरण्यात काही डिफॉल्ट असल्यास, फक्त तुम्ही प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून पॉलिसी पुन्हा चालू करू शकता.
Share your comments