1. इतर बातम्या

Post Office Scheme : संधीच सोन करा..! पोस्टाच्या 'या' योजनेत 50 रुपये गुंतवा, तब्बल 35 लाख मिळवा, पटापट डिटेल्स वाचा

Post Office Scheme : अनेकांना आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक (Investment Tips) करायची असते पण फसवणुकीमुळे लोक कोणत्याही योजनेत (Yojana) गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात तसेच असे काही लोक आहेत ज्यांना गुंतवणूक (Investment) करायची आहे परंतु त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नाही. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या समस्या दूर कारण्यासाठी बहुमूल्य माहिती घेऊन आलो आहोत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
post office scheme

post office scheme

Post Office Scheme : अनेकांना आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक (Investment Tips) करायची असते पण फसवणुकीमुळे लोक कोणत्याही योजनेत (Yojana) गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करतात तसेच असे काही लोक आहेत ज्यांना गुंतवणूक (Investment) करायची आहे.

परंतु त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नाही. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या समस्या दूर कारण्यासाठी बहुमूल्य माहिती घेऊन आलो आहोत.

आज आम्‍ही तुम्‍हाला अशा स्‍कीमबद्दल (Sarkari Yojana) सांगणार आहोत, जिच्‍यामध्‍ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे आणि त्‍याच्‍या गुंतवणुकीसाठी प्रतिदिन केवळ 50 रुपये खर्च येईल.

ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) असं या योजनेचे नाव आहे. या सरकारी योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला लाखोंचा परतावा मिळू शकतो. या योजनेअंतर्गत तुम्ही 50 रुपये गुंतवून 35 लाखांपर्यंतचा मोठा परतावा मिळवू शकता.

इंडिया पोस्टच्या (Post Office Near Me) या सरकारी योजनेत गुंतवणूक करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणुकीत तुम्हाला मोठा नफा मिळेल. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता आणि भविष्यात मोठा निधी उभारू शकता.

सरकारने पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमांतर्गत ही अद्भुत योजना आणली आहे. ही योजना चालू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास त्याचे पैसे त्याच्या नॉमिनी सदस्याला दिले जातील.

गुंतवणुकीसाठी कोणत्या अटी आहेत?

19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. 10 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करता येते. तुमच्या सोयीनुसार, तुम्ही त्याचा हप्ता मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक जमा करू शकता.

जर एखाद्याने वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक केली तर 55 वर्षांसाठी तुम्हाला 1515 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल, ज्याच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 31.60 लाख रुपये मिळतील. दुसरीकडे, 60 वर्षांसाठी मासिक प्रीमियममध्ये 1411 रुपये जमा केल्यानंतर, तुम्हाला 34.60 लाख रुपये मिळतील.

English Summary: post office scheme gram suraksha yojana information marathi Published on: 16 September 2022, 11:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters