पोस्ट ऑफिसच्या स्किममध्ये दररोज 95 रुपये भरुन 14 लाख कमावता येऊ शकतात. या पोस्ट ऑफिस स्किमचे ग्राम सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा असं या स्किमचं नाव आहे. ही पॉलिसी अशा लोकांसाठी अतिशय फायदेशीर आहे, ज्यांना काही-काही वेळाने पैशांची गरज भासते.
काय आहे स्किम -
पोस्ट ऑफिसचा हा एंडोमेंट प्लॅन आहे. यात मनी बॅकसह मॅच्योरिटीवर एकरकमी रक्कम दिली जाते. रुरल पोस्टल लाइफ इन्शोरन्स स्किमची सुरुवात भारत सरकारने 1995 मध्ये केली होती. याचअंतर्गत ग्राम सुमंगल स्किम येते. यात आणखी इतर पाच विमा स्किमदेखील ऑफर केल्या गेल्या आहेत. ग्राम सुमंगल स्किम 15 आणि 20 वर्षांसाठी असते. यात मॅच्योरिटीआधी तीन वेळा मनी बॅक मिळते. या योजनेत गुंतवणूक केलेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना विम्याच्या रकमेसह, बोनस रक्कमही दिली जाते.
कोणाला मिळतो याचा फायदा -
- या स्किमचा लाभ कोणताही भारतीय व्यक्ती घेऊ शकतो.
- या पॉलिसीसाठी कमीत-कमी वयोमर्यादा 19 वर्ष आहे. तर अधिकतर वयोमर्यादा 45 वर्ष आहे.
- पॉलिसी 15 किंवा 20 वर्षांसाठी घेता येऊ शकते.
- 20 वर्षांसाठी पॉलिसी घेतल्यास, वयोमर्यादा 40 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
- यात जास्तीत-जास्त विम्याची रक्कम 20 लाखांपर्यंत उपलब्ध आहे.
कसे मिळतील 14 लाख -
समजा, 25 वर्षीय व्यक्तीने 7 वर्ष सम एश्योर्डसह पॉलिसी खरेदी केल्यास, त्याला वार्षिक प्रीमियम 32,735 रुपये भरावा लागेल. सहा महिन्यांसाठी 16,715 रुपये प्रीमियम आणि तिमाही प्रीमियम 8449 रुपये भरावा लागेल. अशाप्रकारे त्या व्यक्तीला दर महिन्याला 2853 रुपये द्यावे लागतील. म्हणजे 95 रुपये दिवसाला प्रीमियम जाईल. ही पॉलिसी 20 वर्षांच्या हिशोबाने आहे. यात 8 व्या, 12 व्या, 16 व्या वर्षी 20-20 टक्क्यांच्या हिशोबाने 1.4-1.4 लाख रुपये मनी बॅक दिले जातील.
प्रतिनिधी गोपाल उगले
Share your comments