पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूकीसाठी अनेक आकर्षक योजना आहेत व त्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे परतावे मिळत असतात.
अशीच पोस्ट ऑफिस ची एक गुंतवणूक योजना म्हणजेच पोस्ट ऑफिस एम आय एस योजना हि होय. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती घेणार आहोत.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एकरकमी पैसे जमा करून स्वतःसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. जर तुमचे खाते एकच असेल तर तुम्ही जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांपर्यंतची रक्कम यामध्ये जमा करू शकता.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात मुलांच्या नावे देखील खाते उघडता येत. यासाठी संबंधित मुलाचे पालक किंवा त्याचा गार्डियन जो कोणी त्याची काळजी घेईल नंतर जेव्हा ते मुल दहा वर्षाचे होईल तेव्हा ते त्यांच्या नावाने देखील हे खाते स्वतः चालवू शकतील.
या योजनेत गुंतवणूक केली तर त्यावर 6.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे. जर तुम्ही एका खात्याअंतर्गत साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर सध्याच्या व्याज दराप्रमाणे तुम्हाला वर्षाकाठी 29 हजार 700 रुपये मिळतील. दुसरीकडे जर तुम्ही संयुक्त खात्यांतर्गत नऊ लाखांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वर्षाला 59 हजार चारशे रुपये व्याज स्वरूपात मिळेल. याचा मासिक विचार केला तर ती रक्कम होते चार हजार 950 रुपये म्हणजे एवढी रक्कम तुम्हाला मासिक मिळेल.
एमआयएस खात्याचा मॅच्युरिटी कालावधी हा पाच वर्षाचा आहे. परंतु तुम्ही ते आवश्यक असल्यास बंद करू शकता. परंतु यासाठी अट आहे की तुम्ही खाते उघडल्यापासून एक वर्षाचा कालावधी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढायचे असतील तर त्यावर ठेवीच्या रकमेतून दोन टक्के शुल्क आकारले जाते. जर तुम्ही तीन वर्षानंतर पैसे काढले तर त्यावर 1% फी भरावी लागते.
स्त्रोत – झी 24 तास
Share your comments