आज बाजारात भविष्याच्या गुंतवणूकीसाठी अनेक पर्याय आहेत. मात्र, आपल्या पैश्याची सुरक्षितता महत्त्वाची असते. जे लोक अजूनही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची रिस्क घेऊ इच्छित नाही. अशा लोकांसाठी ही योजना चांगली आहे. भविष्यासाठी तुम्हाला सुद्धा गुंतवणूक करायची आहे, पण धोका पत्करायचा नसेल तर भारतीय टपाल खात्याची योजना तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे.
पोस्ट ऑफिस आपल्याला अगदी लहान बचत योजना प्रदान करते. ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने आपल्याला जास्त परतावा दिला जातो. तसेच, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी ग्रामीण सुरक्षा योजना आहे जिच्या अंतर्गत ३५ लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते. इथे गुंतवणूक केल्याचे अनेक फायदे आहेत. या योजनांमध्ये कर सवलतींसोबतच इतरही अनेक फायदे दिले जातात.
ग्रामीण भागातील लोकसंख्येकरिता १९९५ साली ही योजना सुरु करण्यात आली होती. ही योजना गावकऱ्यांना विमा संरक्षण देते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार जास्तीत जास्त गावकऱ्यांना लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. यासोबतच त्यांचा विमाही या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. कमीत कमी १९ वर्षे आणि जास्तीत जास्त ५५ वर्षे वय असणारे गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत वर्षाला किमान १० हजार रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये गुंतवता येऊ शकतात.
योजनेतील ठळक मुद्दे
1. या योजनेत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
2. गुंतवणुकीचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पैसे नॉमिनीच्या नावे केले जातात.
3. या योजनेअंतर्गत वयाच्या ८० व्या वर्षी बोनसचा लाभही दिला जातो.
4. प्रीमियम जमा करण्यासाठी वाढीव कालावधी देखील दिला जातो.
5. ग्राम सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणताही गुंतवणूकदार तीन वर्षांनंतर त्याचे खाते सरेंडर करू शकतो.
असे मिळणार ३५ लाख रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वयाच्या १९ व्या वर्षी जास्तीत जास्त १० लाखांची विमा पॉलिसी घेतली. तर त्याला ५५ वर्षांसाठी १५१५ रुपये प्रीमियम भरावा लागेल, तसेच ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये भरावे लागतील. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला अनुक्रमे ३१.६० लाख, ३३.४० लाख आणि ३४.६० लाख रुपये मिळतील.
Share your comments