सध्या दुसऱ्याच्या नावाचे सिम कार्ड वापरून अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे.बरेचदा व्यक्तीला माहितीच नसते की त्याच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत ते किंवा बऱ्याच वेळा अशा कार्डाचे क्लोनिंगही होते.
बऱ्याच वेळा अशा कार्डाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडताना दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर एखाद्या व्यक्तीच्या आधार क्रमांकावर किती सिम कार्ड आजवर देण्यात आल्या आहेत आणि किती अॅक्टिव आहेत याबाबतचा संपूर्ण तपशील आता टॅफकॉफ(TAFCOF)या पोर्टल द्वारे समजू शकणार आहे.
केंद्रीय दूरसंचार खात्याने हे पोर्टल बनवले आहे. जर आपल्या आधार क्रमांकाचा कोणी दुरुपयोग करत असेल तर या पोर्टलद्वारे ते पटकन समजू शकणार आहे.सध्या ही सेवा फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणा पुरती मर्यादित असून काही काळानंतर भारतातील इतर राज्यातही या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.आता नियमानुसार आधार क्रमांकावर एका व्यक्तीला 9 सिम कार्ड घेण्याची परवानगी आहे.
एखादा अनोळखी नंबर जर एखाद्या व्यक्तीच्या आधार कार्डाशी संलग्न असेल तर त्याची माहिती या पोर्टलवर लगेच मिळेल व हे सिम कार्ड रद्द करण्यासाठी ती व्यक्ती प्रोसेस करू शकते.यासंबंधीची विनंती संबंधित व्यक्ती दूरसंचार खात्याने करू शकते अशी विनंती कोणी केल्यास त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल.
Share your comments