जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया देत आहोत. ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करु शकतात.हा व्यवसाय आहे पोहे तयार करण्याचा. आपल्याला माहित आहेच की,पोह्याशिवाय सकाळचा नाश्ता अपूर्ण असतो. या लेखात आपण पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बद्दल माहिती घेऊ.
पोहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट
हा एक चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायाचे मागणी वर्षभर असते.पो ह्याला एक न्यूट्रीट्रीवफुड मानले जाते.याचा उपयोग नाश्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो कारण हे बनवायला ही सोपे आहे आणि पचायला हलके आहे. पोह्याची बाजारपेठ जलद गतीने वाढत आहे.अशात तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट उभारून आपला व्यवसाय सुरु करु शकतात.
पोहे मॅन्युफॅक्चरिंग लागणारी गुंतवणूक
खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाकडून प्राप्त एका प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी जवळ जवळ 2.43लाख रुपयांचे भांडवल आवश्यक असते.यामध्ये 90 टक्क्यांपर्यंत तुम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकते.
मग याचा विचार केला तर पोहा मनुफॅक्चरिंग युनिट सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त पंचवीस हजार रुपयांची आवश्यकता भासते.
पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट साठी लागणाऱ्या आवश्यक साहित्य…
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाचशे चौरस फूट जागेची आवश्यकता असते. यामध्ये एक पोह्याचे मशीन, भट्टी,पॅकिंग मशीन आणि ड्रम सोबत काय छोटे-छोटे साहित्याची आवश्यकता भासते. खादी आणि ग्रामीण उद्योग महामंडळाच्या प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार, आजचा सुरू करण्यासाठी थोडा कच्चामाल अगोदर आणावा त्यानंतर त्या मदत थोडी थोडी वाढ करत जावी.
म्हणजे हळूहळू अनुभव मिळत जातो व व्यवसायातही वाढ करता येते
कर्ज कसे मिळते?
खादी ग्रामीण उद्योग महामंडळाच्या रिपोर्ट नुसार,जर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला तर तुम्हाला ग्रामोद्योग रोजगार योजनेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करता येतो. या माध्यमातून 90 टक्के लोन मिळते. तसेच खादी एक ग्रामीण उद्योग महामंडळाकडून ग्रामीण भागात उद्योगांना प्रमोट करण्यासाठी कर्ज दिले जाते.त्याचाही फायदा तुम्ही घेऊ शकतात.
Share your comments