पंजाब नॅशनल बँक महिला उद्योजकांसाठी (Women Entrepreneurs) एक योजना राबवत आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचे नाव महिला उद्यम निधी स्कीम (Mahila Udyam Nidhi Scheme) आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांना व्यापार सुरू करण्यासाठी या योजनेतून मदत केली जाते. मिळणाऱ्या या आर्थिक साहाय्याने आपण मॅन्यूफॅक्चरिंग आणि उत्पादन करण्याचे उद्योग सुरू करू शकतो. या योजनेंतर्गंत मिळणाऱ्या कर्जासाठी कोणतीच सिक्योरिटी द्यावी लागत नाही.
दरम्यान आपल्याला याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर आपण पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन याची सविस्तर माहिती घेऊ शकता. किंवा आपण बँकेच्या https://www.pnbindia.in/schemes-for-women.html या संकेस्थळावर जाणून माहिती मिळवू शकता. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत केली जाते, जेणेकरून या मदतीतून महिला आपला व्यवसाय वाढवू शकतील.ज्या महिलांनी नवीनच MSME ची सुरुवात केली आहे. किंवा आधीपासून एमएसएमई चालवत असतील अशा महिलांना हे कर्ज मिळणार आहे. या योजनेच्या साहाय्याने महिला ऑटो दुरुस्ती, सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, केबल टीवी नेटवर्क, कॅन्टीन, किंवा रेस्टोरॅन्ट, सायबर कॅफे, फोनबुथ, लॉन्ड्री, मोबाईल दुरुस्ती, फोटो स्टुडिओ, टीव्ही दुरुस्ती, रोड ट्रांसपोर्ट ऑपरेटर, सलून, कृषी साधनांचे दुकान किंवा दुरुस्ती केंद्रे, ट्रेलरिंग, टायपिंग मशीन आदींचे काम करु शकतील.
Share your comments