भारतातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक यांनी गृहकर्जावर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या बँकांनी गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क( प्रोसेसिंग फी) माफ केली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने 30 सप्टेंबर पर्यंत तर एसबीआयने 31 ऑगस्टपर्यंत कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क नआकारण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखात आपण कोणती बँक गृह कर्जावर किती व्याज आकारते आणि त्यांचे प्रोसेसिंग याविषयी माहिती घेणार आहोत.
आजच्या वेळ विचार केला तर बँकिंग क्षेत्रात सर्वात स्वस्त गृहकर्ज ही कोटक महिंद्रा बँक देते. या बँकेचा गृहकर्जावरील व्याजदर 6.65 टक्के आहे.
त्यानंतर नंबर लागतो तो एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चा एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड6.66 टक्के दराने गृहकर्ज देते. तसेच अनेक बँका 7 टक्केपेक्षा कमी व्याज दराने कर्ज देत आहेत.
- एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड- गृहकर्जावरील व्याजदर -6.65 टक्के
प्रोसेसिंग फी – कमाल दहा हजार रुपये
- कोटक महिंद्रा बँक – गृहकर्जावरील व्याजदर -6.66 टक्के
प्रोसेसिंग फी – 10 ते 15 हजार रुपये
- आयसीआयसीआय– गृहकर्जावरील व्याजदर – 6.70 टक्के
प्रोसेसिंग फि- 0.25 टक्के आणि कमाल पाच हजार पर्यंत
- स्टेट बँक ऑफ इंडिया- गृहकर्जावरील व्याजदर-6.70 टक्के
प्रोसेसिंग फी – 31 ऑगस्टपर्यंत माप
- पंजाब नॅशनल बँक– गृहकर्जावरील व्याजदर -6.80 टक्के
प्रोसेसिंग फी- 30 सप्टेंबर पर्यंत माफ
संदर्भ –( दिव्य मराठी )
Share your comments