देशातील शेतकऱ्यांना शेतासाठी सौर कृषी पंपाचा वापर सुलभता करता यावा, यासाठी पीएम कुसुम योजना सुरू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र साकेत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाअभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन एचपी, पाच एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंपा स्थापित करण्यात येणार आहेत.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेची घोषणा सन दोन हजार अठरा ते एकोणवीस च्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली होती.शेतकर्यांना पिकांना पाणी देण्याच्या बाबतीत बऱ्याच समस्या उद्भवतात जसे की,मोसमी पावसाची अनियमितता,विजेचा सततचा लपंडाव,जलसिंचन सुविधांची अपूर्णता इत्यादी.ह्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम योजना आणली होती.बऱ्याचदा अपुऱ्या पावसामुळे आणि विजेच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देणे दुर्लभ होते व पिकांचे अतोनात नुकसान होते. परंतु कुसुम योजनेद्वारेशेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवर सौर ऊर्जेचे पॅनल आणि पंप लावून शेतीला नियमितपणे पाणी देता येणार आहे.योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळजवळ वीस लाख स्वरूपात शेतकऱ्यांना दिली गेल्याची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दिली होती.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणाच्या https://mahadiscom.in/solar-pmkusum/index-mr. html या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जमिनीचा सातबारा उतारा
- बँक खाते पासबुक झेरॉक्स
- जलसंपदा विभाग किंवा जलसंधारण विभागाचे पाणी उपलब्ध बद्दलचा प्रमाणपत्र
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहा टक्के खर्च स्वतः करावा लागतो. एसीआणि एसटी कॅटेगरी च्या शेतकऱ्यांना पाच टक्के खर्च करणे आवश्यक असतात.
Share your comments