1. इतर बातम्या

PM Kisan Yojana: 'या' चुका दुरुस्त केल्या नाहीतर आताही नाही येणार २ हजार रुपये

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि या वर्षाचा दुसरा हप्ता लवकरच बँक खात्यात येणार आहे. पुढील महिन्यात सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहे. मोदी सरकारने सुरू केलेली पीएम किसान सम्मान निधी योनजा ही खूप लोकप्रिय झाली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पीएम किसान सम्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आणि या वर्षाचा दुसरा हप्ता लवकरच बँक खात्यात येणार आहे. पुढील महिन्यात सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकणार आहे. मोदी सरकारने सुरू केलेली पीएम किसान सम्मान निधी योनजा ही खूप लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत असते, पण काही शेतकरी आहेत की त्यांना या योजनेचा लाभ गेल्या काही हप्त्यापासून मिळत नाही.  या शेतकऱ्यांच्या कागदपत्रामध्ये गडबडी असल्याने त्यांना मागील हप्ता आलेला नाही.

जर साधरण वाटत असलेल्या चुका आपण दुरुस्त अजून केल्या नसतील तर पुढील महिन्यात येणारे पैसेही आपल्या खात्यात येणार नाही. बऱ्याच वेळेच आधार कार्ड आणि अर्जातील नावाचे अक्षर चुकीचे असते. तर काहीच्या नाव बँक खात्यात वेगळे असते, तर काहींनी आधार क्रमांक बरोबर टाकला नाही तर काहींनी बँकचा आयएफएससी कोड व्यवस्थित टाकलेला नाही. अशा चुका असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. जर आपल्या नावात किंवा अर्जात चुकी असेल आताच त्याची दुरुस्ती करुन घ्या. विशेष म्हणजे तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलवरुन आपल्या चुका दुरुस्त करु शकतात. यासाठी आपल्याला पीएम किसान ऐप डाऊनलोड करावे लागेल.

अशा पद्धतीने दुरुस्त करा आपल्या चुका 

PM-Kisan Scheme च्या अधिकृत संकेतस्थळ (https://pmkisan.gov.in/) यावर जा. येथे  फार्मर कॉर्नरच्या आत जाऊन Edit Aadhaar Details या पर्ययावर क्लिक करा. येथे आपला आधार नंबर नोंदवा. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.  आता जर आपले नाव चुकीचे असेल तर ते ठीक करा. जर अजून काही दुसरी चुकी असेल तर आपण कृषी विभगाशी संपर्क करावा.  जर यानंतरही आपल्या खात्यात पैसे आले नाही तर आपण केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या हेल्पलाईन (PM-Kisan Helpline 155261 किंवा 1800115526  या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा आणि आपली तक्रार नोंदवा.  या नंबर आपली तक्रार ऐकली गेली नसेल तर आपण मंत्रालयाच्या (011-23381092) नंबरवर संपर्क साधावा.

English Summary: PM Kisan Yojana: If 'these' mistakes are not corrected, then this installment also cancel Published on: 17 July 2020, 08:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters