1. इतर बातम्या

पीएम - किसान योजना : आता अतिरिक्त २ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार ६ हजार रुपये

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना PM Kisan Samman Nidhi Scheme) मागील वर्षी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना PM Kisan Samman Nidhi Scheme) मागील वर्षी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. सरकारकडून शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्षाला हजार रुपये पाठवले जातात. या योजनेची पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकला जाणार आहे.

कशाप्रकारे मिळणार योजनेचा पैसा

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत ६ हजार रुपये तीन टप्प्यात दिले जाते. प्रत्येक टप्प्यात २ हजार रुपये दिले जात असून हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात.  पैसे आपल्या खात्यात आल्याची माहिती मोबाईलवर मेसेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जाते.

कसा करणार योजनेसाठी अर्ज - योजनेची नोंदणी करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. भारत सरकारचे संकेतस्थळ www.pmkisan.gov.in/ वर जाऊन नोंदणी करू शकता.  किंवा https://www.pmkisan.gov.in/RegistrationForm.aspx येथे आपण नोंदणी आणि अर्ज भरून आपली नोंदणी करु शकता.  याशिवाय तुम्ही राज्य सरकार द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पीएम - योजनेच्या नोडल अधिकाऱ्यासी संपर्क करु शकता. किंवा आपल्याजवळील सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आपला अर्ज करू शकता.

दरम्यान या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलाश चौधरी यांनी याविषयी माहिती दिली आहे. चौधरी म्हणाले की, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची व्याप्ती वाढविण्यात येत आहे.  यामुळे अतिरिक्त २ कोटी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळतील. नियम बदलल्यामुळे २ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत होता आता ही मर्यादा वाढविण्यात आली आहे.  सरकारने ही योजना मागील वर्षी केंद्र सरकारने सुरू केली होती. या योजनेतून २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.  तीन हप्त्याने शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन - दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो.

English Summary: Pm Kisan : more 2 crore farmer can get benefit of this scheme Published on: 22 June 2020, 05:56 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters