1. इतर बातम्या

शेतकऱ्यांनो ! PM-KMY योजनेतून वर्षाला मिळवा ३६ हजार रुपये

जगाच्या पोशिंद्याला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याच्या काळात तर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयुष्यभर रानात काबाडकष्ट करत असतो, परंतु त्यांच्या म्हतारपणात मात्र त्याला पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात. बळीराजाच्या या समस्येची दखल घेत केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना. ही योजना २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती

KJ Staff
KJ Staff


जगाच्या पोशिंद्याला आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.  सध्याच्या काळात तर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयुष्यभर रानात काबाडकष्ट करत असतो.  परंतु त्यांच्या म्हतारपणात त्याला पैशासाठी दुसऱ्यांकडे हात पसरावे लागतात . बळीराजाच्या या समस्येची दखल घेत केंद्र सरकारने एक योजना आणली आहे.  या योजनेचे नाव आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजना.  ही योजना २०१९ मध्ये लॉन्च करण्यात आली होती.  परंतु बऱ्याच आपल्या शेतकरी बांधवांना या योजनांविषयी माहिती नसते. या १८ ते ४० वय वर्ष असलेले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धपकाळात आधार देणारी आहे.  ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेती आहे, त्याच्यासाठी ही योजना आहे.  या योजनेच्या अंतर्गत बळीराजा महिन्याला साधारण ३ हजार रुपयांचे पेन्शन मिळवू शकतो.   जर वयाच्या ६० व्या वर्षा पेन्शनधारक शेतकरी दगावला तर त्याच्या पश्चात त्यांच्या पत्नीला निम्म म्हणजे ५० टक्के प्रमाणे ही पेन्शन मिळते.  पत्नी व्यतिरिक्त कोणालाच या योजनेचा लाभ मिळत नाही.  (PM-KMY) या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याच प्रकारची नोंदणी फी लागत नाही.  याविषयीच निर्देश कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.   जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या (PM-KMY) योजनेसाठी परत दुसरे कागदपत्र दाखविण्याची गरज नाही.   यात शासनाने एक सवलत दिली आहे, जर तुम्हाला या पंतप्रधान किसान योजनेतून पैसा मिळत आहे.   तो पैसा आपण थेट या योजनेचा हफ्ता भरण्य़ासाठी वापरु शकता.  यामुळे तुमच्या खिशाला झळ पोहचणार नाही.

PM Kisan Maandhan Yojana चा फायदा

३ हजार रुपये दरमहा मिळण्याची हमी  किंवा ३६ हजार रुपये मिळण्याची हमी, ऐच्छिक सहयोगाची योजना - म्हणजे तुमच्या मनानुसार तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकतात.  सरकारही आपण गुंतवलेल्या पैशाइतकेच पैसे लावते.   जर एखाद्या शेतकऱ्यांने या योजनेचा कालावधी पुर्ण होण्याआधीच म्हणजे १० वर्षाच्या आधी योजना बंद केली तर बँक त्यांना हा परत करते.   पण हा पैसा बचत खात्याच्या व्याजदराप्रमाणेच हे पैसे परत मिळत असतात.  शेतकऱ्यांना या योजनेत फक्त ५५ ते २०० रुपये गुंतवावे लागतात.   हा हफ्ता आपल्या वयावर अवलंबून आहे.  PM Kisan Mandhan Yojana साठी तुम्ही ऑनलाईन ही नोंदणी करु शकता. अधिक माहितीसाठी क्लिक करा  या लिंकवर  pmkmy.gov.in 

English Summary: PM Kisan Mandhan Yojana: Farmers Can Get Rs. 36000 Yearly through This Government Scheme Published on: 09 April 2020, 06:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters