1. इतर बातम्या

पेट्रोल डिझेलचे दर जाहीर! पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये प्रतिलिटर

Petrol-Diesel Price: देशात महागाईचा आगडोंब उठला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट ढासळले आहे. आज पुन्हा एकदा देशात सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलबाबत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

petrol disel today rates

petrol disel today rates

Petrol-Diesel Price: देशात महागाईचा आगडोंब उठला आहे. इंधनाचे दर (Fuel Rates) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट ढासळले आहे. आज पुन्हा एकदा देशात सरकारी तेल कंपन्यांकडून (Government oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. पेट्रोल डिझेलबाबत सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज शुक्रवार 30 जुलैसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग ७१व्या दिवशी दिलासा मिळाला आहे. म्हणजेच आजही तेजचे भाव स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या, ब्रेट क्रूड प्रति बॅरल सुमारे $100 आहे.

महाराष्ट्र वगळता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल जुन्या दरात मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्यानंतर आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते. आज पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.

शेतकऱ्यांची होणार चांदी! या झाडांच्या लागवडीपासून मिळणार बक्कळ पैसा

मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.

चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.

पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर : पेट्रोल 103.99 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
नोएडा : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.

तज्ज्ञांच्या मते या पिकांची काढणी यंत्राने नव्हे तर हाताने करावी; कारण...

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPRICE पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.

त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले आहे

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात.

महत्वाच्या बातम्या:
भावांनो 'या' मशरूमची लागवड करून व्हाल लखपती! बाजारात असते बाराही महिने मागणी
शेतकऱ्यांच्या आयुष्यात दरवळेल पैशांचा सुगंध! वेलची लागवड करा आणि लाखो कमवा

English Summary: Petrol diesel rates announced! Published on: 30 July 2022, 08:54 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters