Petrol Diesel Price Today: रशिया युक्रेन युद्धापासून भारतातच नाही तर अनेक देशांमध्ये महागाईचा (inflation) आगडोंब उठला आहे. त्यामुळे काही देश अक्षरशः दिवाळखोरीत निघाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमती गगनाला भिडल्याने देशात सर्वच जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत.
वाढत्या महागाईच्या काळात जनतेला दिलासा देणारी मोठी बातमी समोर येत आहे. होय, भारताचा (India) शेजारी देश श्रीलंकेत (Sri Lanka) पेट्रोलच्या (Petrol) दरात 40 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. सरकारने अचानक केलेल्या या घोषणेनंतर लोकांना दिलासा मिळत आहे.
खरं तर, श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी शुक्रवारी सांगितले की, देशात पेट्रोलचे दर 40 रुपयांनी कमी झाले आहेत. आता लोकांना 410 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळणार आहे. पूर्वी ते ४५० रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते.
युरिया-डीएपीपेक्षा स्वस्त आणि मस्त आहे हे खत; पिकांना ठरतंय वरदान
भारताबद्दल बोलायचे झाले तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अजूनही कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. यासह कोलकात्यात एक लिटर पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
5G नेटवर्कचा शेतीला होणार मोठा फायदा! शेतकऱ्यांना मिळणार हवामानाची अचूक माहिती
मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली : पेट्रोल 96.62 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू: पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुवनंतपुरम : पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
महत्वाच्या बातम्या:
पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग! येत्या ४ दिवसांत महाराष्ट्रात धो धो कोसळणार...
मत्स्य पालनाचा व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ पैसा; व्यवसायावर मिळतेय बंपर सबसिडी
Share your comments