Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली गेल्यानंतरही शनिवारी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कायम होत्या. खरं पाहता गेल्या चार महिन्यांपासून देशात इंधनाच्या किमती स्थिर आहेत. मात्र असे असले तरी देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी तफावत बघायला मिळते.
देशातील काही भागात पेट्रोल आणि डिझेल अधिक स्वस्त तर देशातील काही भागात पेट्रोल आणि डिझेल खूपच महाग असे चित्र आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाविषयी सांगत आहोत जिथे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळते.
सर्वात महाग पेट्रोल श्रीगंगानगरमध्ये आहे
सर्वप्रथम, राजस्थानमधील श्रीगंगानगरबद्दल बोलूया, येथे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.49 रुपये आहे. तर इथे तुम्हाला डिझेलसाठी 98.24 रुपये मोजावे लागतील.
यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते. श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39 रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे
आंतरराष्ट्रीय स्तरावर आज लंडन ब्रेंट क्रूड 86.15 डॉलर प्रति बॅरल आणि अमेरिकन क्रूड 4.86 टक्क्यांनी घसरून 79.43 डॉलर प्रति बॅरलवर आहे. देशांतर्गत तेल विपणन कंपनी भारत पेट्रोलियमच्या म्हणण्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. मूल्यवर्धित कर (VAT) आणि मालवाहतूक शुल्काच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात.
Share your comments